घरदेश-विदेशSidhu Moose Wala Murder : सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला लवकरच घेऊ; दिल्लीच्या...

Sidhu Moose Wala Murder : सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला लवकरच घेऊ; दिल्लीच्या ‘या’ गँगने दिले ओपन चॅलेंज

Subscribe

पोलिसांच्या माहितीनुसार, नीरज बवानिया (Neeraj Bawana) हा दिल्लीतील रहिवासी असून त्याच्याविरोधात खून, दरोडा, खंडणी वसूली यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moose Wala) हत्येचा सर्वच सिनेविश्वासह सर्वच स्तरातून जाहीर निषेध व्यक्त केला जातोय, अशात मूसेवालाच्या हत्येचा बदला लवकरचं घेणाऱ असल्याची धमकी एका गँगने दिली आहे. पंजाबी गायकाच्या हत्येचा सूड लवकरच घेतला जाईल, असे ओपन चँलेंज दिल्लीतील एका गँगने दिले आहे. या धमकीबाबत आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पुष्टी केली आहे.

स्पेशन सेलने यावर सांगितले की, नीरज बवानिया गँगनेही धमकी दिली आहे. या धमकीनंतर दिल्ली-एनसीआर, पंजाबसह उत्तर भारतात गँगवॉर भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचपार्श्वभूमीर दिल्ली-एनसीआरमधील गुंडांवर आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच तिहार आणि इतर कारागृहात कैदी असलेल्या गुंडांचीही चौकशी सुरु केली आहे.

- Advertisement -

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या माहितीनुसार, पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येनंतर दिल्ली-एनसीआरच्या नीरज बवाना गँगने लवकरच या हत्येचा बदला घेतला जाईल, असे म्हटले आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. ज्या फेसबुक आयडीवरून ही धमकी देण्यात आली आहे त्यावर नीरज बवानिया याचा डीपी दिसतोय.

पोलिसांच्या माहितीनुसार, नीरज बवानिया (Neeraj Bawana) हा दिल्लीतील रहिवासी असून त्याच्याविरोधात खून, दरोडा, खंडणी वसूली यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो तिहार कारगृहात कैदी आहे. याच कारागृहातून आपली गँग चालवत असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतील गँगस्टर नीतू दाबोडियाच्या एन्काउंटरनंतर नीरज बावानीचा दबदबा वाढला होता.

- Advertisement -

नीरज बवानियाच्या धमकीनंतर आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची त्याच्यावर करडी नजर आहे. (Neeraj Bawana Gang) सध्या उत्तर भारतातील गँगस्टर दोन गटात विभागले गेले आहेत. एका गँगमध्ये लॉरेन्स बिश्रोई, (Lowrance Vishnoi) संपत नेहरा, संदीप उर्फ​काला जठेडी, जितेंद्र गोगी गिरोह, कपिल सांगवान उर्फ ​​नंदू गँग, हसिम बाबा, राजेश बवानिया आणि कपिल यांचा समावेश आहे.

दुसरीकडे पंजाबच्या नीरज बवानिया गँगमध्ये (Davinder Bambiha Gang) सुनील उर्फ टिल्लू ताजपुरिया, सुनील राठी, कौशल गँग, प्रवेश मान, नवीन बाली आणि देवेंद्र बनविहाचा समावेश आहे. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सर्व तुकड्या सक्रिय झाल्या असून कारागृहातील आणि बाहेरील सर्व गुंडांवर नजर ठेवण्यात आली आहे.


Target Killings in Jammu Kashmir : काश्मीर खोऱ्यात वाढत्या टार्गेट किलिंगच्या घटना; अमित शहांची ३ जूनला एलजीसोबत बैठक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -