रानबाजारचा थरार नव्या भागातही, ३ जूनला प्रदर्शित होणार पुढील भाग

रानबाजारचे(ranbazar) या पूर्वी जे भाग प्रदर्शित झाले त्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. आणि आता याच वेब सिरींजचा पुढचा भाग ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीने सजलेला हा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मागच्या काही दिवसांपासून रानबाजार (ranbazar) या वेब सिरीजची सर्वत्रच चर्चा रंगली आहे. या वेब सिरीजमध्ये मांडण्यात आलेला वेगळा विषय, कलाकारांचा दमदार अभिनय,  कथा यामुळे रानबाजार वेब सिरीज चर्चेच्या केंद्रस्थानी होती. रानबाजारचे (ranbazar) या पूर्वी जे भाग प्रदर्शित झाले त्यांना प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. आणि आता पुढचा भाग ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीने सजलेला हा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

एका उत्तम कथेला सत्यात उतरविण्याचं काम रानबाजारमध्ये योग्य पद्धतीने केले आहे. प्रेक्षक सुद्धा या वेब सिरीजला भरघोस प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या वेब सीरिजचे ५ भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हे भाग जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हाही या वेबसीरिजच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा प्रेक्षकांमध्ये होती. पुढचा भाग येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये आणि येणाऱ्या नवीन भागात अनेक दिग्गज कलाकार प्रेक्षकांना दिसणार आहेत. यात प्राजक्ता माळी (prajakta mali), तेजस्विनी पंडित (tejswini pandit), डॉ. मोहन आगाशे (Dr. mohan agashe), सचिन खेडेकर (sachin khedekar), वनिता खरात, माधुरी पवार (madhuri pawar), वैभव मांगले (vaibhav mangale), अनंत जोग हे कलाकार दिसत आहेत. पाॅलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या वेब सिरीजमध्ये डॉ. मोहन आगाशे यांनी सतीश नाईक ही  व्यक्तिरेखा साकारली आहे. या वेब सिरीजमधून दिग्दर्शक अभिजित पानसे हे पहिल्यांदाच अभिनय करताना दिसत आहेत. प्रत्येक कलाकारांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. मराठी चित्रपट सृष्टीमतील अनेक अनुभवी आणि दिग्गज कलाकारांची फौज या वेब सिरीजमध्ये आहे.

दिग्दर्शक अभिजित पानसेंनी (abhijit panse) ही वेब सिरीज एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. प्रेक्षकांच्या  उत्तम प्रतिक्रियांमुळे ही वेब सिरीज साकारण्यासाठी संपूर्ण टीमनेच मेहनत घेतली आहे.  त्यांच्या मेहनतीचं फळ हे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांच्या रूपाने मिळत आहे. रानबाजार (ranbazar) या वेब सीरिजच्या यशाने ती ज्या ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT platform) वर प्रदर्शित झाली त्या ओटीटी प्लॅटफॉर्मला सुद्धा आधीपेक्षा अधिक प्रेक्षक पसंती मिळत आहे.  वेब सिरीजचा नवा भाग प्रेक्षकांना कसा कसा वाटतो आणि त्यावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कश्या असणार आहेत त्याचबरोबर नवीन भागात नेमकी काय गोष्ट पाहायला मिळणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.