घरताज्या घडामोडीAfghanistan: लग्नात गाणी लावल्यामुळे तालिबान्यांनी १३ जणांना केलं ठार

Afghanistan: लग्नात गाणी लावल्यामुळे तालिबान्यांनी १३ जणांना केलं ठार

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये सत्ता आल्यापासून तालिबान आपला क्रूर चेहरा दाखवत आहे. कोणत्याही कारणांमुळे निष्पाप लोकांवर गोळीबार करत आहे. तसेच अनेक निर्बंध लावले जात असून प्रत्येक अधिकार हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे. आता एका लग्नात गाणी लावल्यामुळे तालिबान्यांनी १३ जणांचा ठार मारल्याचा मोठा आरोप अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी केला आहे.

संगीताबाबत तालिबान्यांचा द्वेष वेगळ्या पातळीवर पाहायला मिळत आहे. ऑगस्टमध्ये महिलांना टीव्हीवर गाणं म्हणण्यावर बंदी घातली होती. त्यानंतर गायक फवाद अंद्राबीला गोळी मारल्याची बातमी समोर आली. मग सप्टेंबरमध्ये काबुलच्या रिकॉर्डिंग स्टुडिओमध्ये अनेक म्युझिकल इंस्ट्रूमेंट तोडले होते. अशात आता लग्नात गाणी लावल्यामुळे १३ जणांना ठार मारल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

अमरुल्लाह सालेह यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ‘लग्नात गाणी वाजवत असल्यामुळे नांगरहारमध्ये तालिबान्यांनी १३ जणांना ठार मारले. आता फक्त आम्ही राग जाहीर करू शांत राहू शकत नाही. गेल्या २५ वर्षांमध्ये पाकिस्तानने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले. याच माध्यमातून अफगाणिस्तान संस्कृतीला नष्ट केले आहे.’ आता सालेह यांना तालिबान राजवटीत सक्रिय राजकारण करण्याची संधी मिळत नसून या सरकारचा पर्दाफाश करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत.

जेव्हापासून तालिबानने आपले सरकार अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित केले आहे, अशा घटना घडणे सामान्य झाले आहे. कोणतेही कारण नसतानाही लोकांना मारले जात आहे आणि त्याचे अधिकार हिसकावले जात आहेत. महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लावले जात आहेत. काही क्षेत्रात अजूनही महिलांसाठी शाळा खुल्या झाल्या नाही आहेत. तसेच अफगाणिस्तानचे महिला मंत्रालय बंद केले गेले आहे. अशा परिस्थिती तालिबान असे काही निर्णय घेत आहे, ज्यामुळे जगामध्ये आपली कट्टरतावादी विचारसरणी दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची अशी आहे लाईफस्टाईल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -