Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी घट्ट पँट घातल्यामुळे महिला खासदाराला भर संसदेमधून अध्यक्षांनी काढले बाहेर

घट्ट पँट घातल्यामुळे महिला खासदाराला भर संसदेमधून अध्यक्षांनी काढले बाहेर

Related Story

- Advertisement -

प्रत्येकाने कसे कपडे परिधान करावे याचा अधिकार ज्याचा त्याला असतो. पण महिलांसाठी हा निर्णय घेणे काहीस सोपे नाही आहे. मग ती किती उच्च पदस्थ असो. तिला अनेकांची मन जपण्याकरीता त्यांच्या म्हणण्यानुसार कपडे परिधान करावे लागले. दरम्यान टांझानियामध्ये एका खासदार महिलेल्या घट्ट पँट घातल्यामुळे संसदेच्या बाहेर काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

टांझानियाच्या महिला खासदार कॉनडेस्टेर शिजवेल (Condester Sichwale) यांना संसदेच्या अध्यक्षांनी बाहेर काढले. अध्यक्ष जॉब डुगाई (Job Ndugai) म्हणाल्या की, ‘पहिल्यांदा बाहेर जाऊन व्यवस्थित कपडे घाला आणि नंतर संसदेत या.’

- Advertisement -

या घटनेचे सुरुवात तेव्हा झाली जेव्हा पुरुष खासदार हुसैन अमर यांनी कॉनडेस्टर यांचे कपडे पाहून म्हणाले की, ‘आपल्या काही भगिनींनी अजब कपडे परिधान केले आहेत. त्या समाजाला काय दाखवत आहेत?’ हुसैन अमर यांचे मत होते की, संसदेत समाजाचे विचार आणि प्रतिबिंब दिसून येतात. त्यांनी संसदेच्या नियमांबाबत सांगत असताना म्हणाले की, महिलांनी संसदेत घट्ट पँट घालून का येऊ नये.

- Advertisement -

त्यामुळे कॉनडेस्टर यांना कपड्यांमुळे संसदेतून बाहेर काढले गेले. पण यामुळे दुसऱ्या महिला खासदारांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारे कॉनडेस्टर यांना बाहेर काढल्यामुळे त्यांची माफी मागितली पाहिजे. कॉनडेस्टर यांना बाहेर काढल्यानंतर अध्यक्ष म्हणाले की, ‘महिला सदस्यांच्या कपड्यांवरून हे पहिल्यांदा घडले नाही आहे.’ त्यामुळे आता त्यांनी संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत की, कोणी वेगळ्या आणि विचित्र कपड्यांमध्ये दिसले तर त्यांना संसदेत येण्याची परवानगी देऊ नये.


हेही वाचा – बापरे! HIVग्रस्त महिलेच्या शरीरात २१६ दिवस राहिला कोरोना; ३२ वेळा बदलले रुप


 

- Advertisement -