घरदेश-विदेशTelangana Srisailam power plant fire: हायडल पॉवर प्लांटला आग, ९ जणांचा मृत्यू

Telangana Srisailam power plant fire: हायडल पॉवर प्लांटला आग, ९ जणांचा मृत्यू

Subscribe

तेलंगणाच्या श्रीश्यलम हायडल पॉवर प्लांटला (hydel power plant) आग लागली. या आगीत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. हायडल पॉवर प्लांटमध्ये स्फोट होऊन मोठी आग लागली. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ९ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. सुरुवातीला फक्त सहा लोकांचे मृतदेह बाहेर काढले जाऊ शकले. परंतु सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व कामगारांचे मृतदेह बाहेर काढले गेले आहेत. एक्झिट गेटवर सर्व मृतदेह सापडले होते. सर्वजण बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.

गुरुवारी रात्री तेलंगणा सरकारच्या भूमिगत उर्जा प्रकल्पात स्फोट (Telangana Srisailam power plant fire) झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. स्फोटानंतर आग लागली. असा अंदाज आहे की स्फोट झाल्यामुळे ९ कामगार भूमिगत उर्जा प्रकल्पात अडकले होते. यानंतर बचाव मोहीम राबवण्यात आली. शुक्रवारी सकाळी तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश रेड्डी म्हणाले की, गुरुवारी रात्री स्फोट झाला तेव्हा ३० कामगार श्रीसैलमच्या प्लांटमध्ये होते. १५ लोक बोगद्यातून बाहेर पडले आणि इतर सहा मजुरांची सुटका करण्यात आली. मात्र, ९ कामगार आत अडकले होते. आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले होते. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या घटनेचा शोक व्यक्त केला आहे. “श्रीश्यलम हायडल पॉवर प्लांटमध्ये लागलेल्या आगीची घटना अत्यंत दुःखद आहे. या दु: खाच्या घटनेत सर्व शोकग्रस्त कुटुंबेसमवेत आहे. मला आशा आहे की अपघातात जखमी झालेले लोक लवकरच बरे होतील,” असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे. याशिवाय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – पंतप्रधान मोदी आणि रजनीकांतनंतर अक्षय कुमार Man Vs Wild मध्ये दिसणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -