घरदेश-विदेशजम्मू-काश्मीरमध्ये CRPF च्या १० जवानांसह ५ पोलिसांना कोरोनाची लागण!

जम्मू-काश्मीरमध्ये CRPF च्या १० जवानांसह ५ पोलिसांना कोरोनाची लागण!

Subscribe

५ दिवसांत तिसऱ्यांदा सीआरपीएफच्या जवानांना कोरोनाचा संसर्ग

जम्मू-काश्मीरमधील १० सीआरपीएफ जवान आणि ५ पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी कोणीही कुठेही कोणताच प्रवास केलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, संक्रमित लोकांच्या संपर्काच आलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. गेल्या ५ दिवसांत तिसऱ्यांदा सीआरपीएफच्या जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यापूर्वी, १० जून रोजी, दलाच्या २८ जवानांना संसर्ग झाल्याची समोर आले होते, तर शनिवारी २४ जवान कोरोना संक्रमित असल्याचे आढळले. दरम्यान ८ जून रोजी कोरोनाची लागण झालेल्या एका जवानाचा मृत्यू झाला.

दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणखी ३ जणांचा मृत्यू झाला आहे. या केंद्रशासित प्रदेशात कोरोना साथीच्या आजारामुळे आतापर्यंत एकूण ५९ लोकांचा मृत्यू झाला आहे. जम्मूमध्ये एकाचा आणि काश्मीर खोऱ्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जम्मू शहरातील गांधी नगर येथे राहणाऱ्या ६९ वर्षीय व्यक्तीला २४ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले होते. तसेच त्याला फुफ्फुसांच्या गंभीर आजाराने देखील ग्रासले होते.

- Advertisement -

काश्मीर खोऱ्यात दोन लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला त्यातील एकाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला तर दुसर्‍याचा रविवारी मृत्यू झाला. श्रीनगर शहरातील नौगाम भागात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा शनिवारी रात्री एसकेआयएमएस रुग्णालयात मृत्यू झाला. ५ जून रोजी त्याला दाखल करण्यात आले होते आणि त्यांना संसर्ग होण्याची चिन्हे नव्हती. रविवारी या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले. त्याला आधीपासूनच उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजार होता. उत्तर-काश्मीरच्या कुपवाडा येथील रुग्णालयात रविवारी एका ८५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला किडनीचा आजार आणि इतर शारीरिक त्रास असल्याचेही सांगितले जात आहे.


रशियाच्या विजयोत्सवात भारताच्या तिन्ही सैन्य दलांचा सहभाग!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -