घरदेश-विदेशबलात्कार करुन गाडलेल्या मुलीचा शोध थांबला

बलात्कार करुन गाडलेल्या मुलीचा शोध थांबला

Subscribe

मुझ्झफरपूरमधील सेवा संकल्प एवं विकास समितीच्या शेल्टर होममध्ये मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यातील एका मुलीवर बलात्कार करुन तिला शेल्टर होममधील परीसरात गाडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत होते. यानंतर पोलिसांकडून या परिसरात खोदकाम सुरु होते. मात्र काही वेळेनंतर मृतदेह न मिळाल्यामुळे खोदकाम थांबवण्यात आले. यामुलींचा शोध अद्याप सुरुच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

- Advertisement -

काय आहे प्रकरण

मुझ्झफरपूरमधील शेल्टर होममधील मुलींसोबत लैंगिक अत्याचार केले जातात, अशी माहिती मुंबईच्या टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या एका अहवालातून समोर आली होती. येथील मुलींशी संवाद साधल्यानंतर शेल्टर होम मधील धक्कादायक वास्तव समोर आले होते. काही आठव़ड्यांपूर्वी येथील एका मुलीने बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हे शेल्टर होम प्रकाशझोतात आले होते. महिन्याभरासाठी हे शेल्टर होम सीलदेखील करण्यात आले आणि येथील २१ मुलींची सुटका करण्यात आली. त्यांची आरोग्य चाचणी केल्यानंतर आता २१ पैकी १६ मुलींवर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे. तर आणखी ८ मुलींच्या वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरप्रीत कौर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

- Advertisement -

रोज मारले जायचे!

चौकशीत शेल्टर होममधील सगळा प्रकार हळूहळू समोर येऊ लागला आहे. येथील मुलींना शरीरसंबंधासाठी शेल्टर होमच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण केली जायची, असे येथील मुलींनी सांगितले आहे. तर एका मुलीवर बलात्कार करुन तिला मारहाण करण्यात आली. यात तिचा मृत्यू झाला त्यानंतर तिला गाडण्यात आले असा आरोप येथील मुलींनी केला आहे. त्यानुसार आता या मुलीचा तपास पोलीस करत आहे. शिवाय आता ८ मुलींच्या वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे.

शेल्टर होम चालकांना अटक

बिहार राज्यसरकारचे हे शेल्टर होम असून ब्रिजेश ठाकूर आणि विनीत कुमार हे दोघे शेल्टर होम चालवतात. या घटनेनंतर तातडीने या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय या शेल्टर होममधील महिला कर्मचारी आणि चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -