घरदेश-विदेशराष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप तिहार जेलमध्ये अडकली -पंतप्रधान

राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप तिहार जेलमध्ये अडकली -पंतप्रधान

Subscribe

महायुती महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील महाभेसळ साफ करणार असे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा आजकाल त्यांना झोप का येत नाही आहे. कारण त्यांची झोप दिल्लीमधील तिहार जेलमध्ये अडकली आहे. मला सगळं काही सांगायचं नाही आहे. पण जो तिहार जेलमध्ये गेला तो सर्वकाही बोलून गेला तर आपले काय होईल याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सतावत, असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी गोंदियात सभा झाली. ही त्यांची महाराष्ट्रातील दुसरी सभा होती. पहिल्या सभेला वर्ध्यात पुरेशी गर्दी जमली नव्हती. मात्र दुसर्‍या सभेला भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. गोंदिया-भंडारातून भाजप उमेदवार सुनील मेंढे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात नाना पंचबुद्धे आहेत. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा लक्ष्य केले.

- Advertisement -

मोदी म्हणाले की, शरद पवार यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी ते सहमत आहेत का हे सांगावे. शरद पवार शांत का बसले आहेत? सुरक्षादलांना दुर्बळ करण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसशी सहमत आहे का हे सांगावे. पाच वर्षे यूपीए सरकारच्या चुका सुधारण्यातच गेली. आता आपल्या सहकार्याने विकासाचा नवा हायवे तयार होईल. दिल्लीत एसीमध्ये बसलेले लोक रोज नव्या गोष्टी सांगत आहेत. मोदीचे नाव घेतलं की त्यांची झोप उडत आहे. लोक बालाकोट विसरले असे म्हणत आहेत. त्यांना मला सांगायचे आहे की देश अजून 1962 चे युद्ध विसरलेला नाही तर बालाकोट कसा विसरेल.

सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा देश प्रथम येतो नंतर पक्ष असं सांगताना देशाने आता आपली दिशा आणि गती बदलली आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. काँग्रेसकडून पुन्हा एकदा देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असून देशावर पूर्ण कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसकडून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.

- Advertisement -

काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या कारस्थानांचे योजनापत्र आहे. काँग्रेसने देशाचे रक्षण करणार्‍या जवानांचे खच्चीकरण करण्याचा डाव आखला आहे. ’भारत तेरे टुकडे होंगे’ या घोषणा ज्या प्रवृत्तींनी दिल्या त्यांना खतपाणी घालण्याचेच काम काँग्रेस करत आहे. पंतप्रधानपदावर मोदी असल्याने लोकांचे भले होते आहे आणि आपली मलाई जात असल्याची चिंता काँग्रेसला सतावत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे पाकिस्तानच्या षडयंत्रांची योजना आहे.काँग्रेस राष्ट्रवादीचा शहरी नक्षलवाद्यांना पाठिंबा असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -