Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नर्स मोबाईलवर बोलतच राहिली, अन् दुसऱ्यांदा टोचली कोरोना लस

नर्स मोबाईलवर बोलतच राहिली, अन् दुसऱ्यांदा टोचली कोरोना लस

वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंताजनक परिस्थिती वाढतच चालली आहे. मात्र या गंभीर परिस्थितीतही कधी आरोग्य कर्मचाऱ्यांचा कर कधी सामान्य नागरिकांचा हलगर्जीपणा समोर येत आहे.

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाबाबत लढा देण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. देशात नुकतच तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु झाले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंताजनक परिस्थिती वाढतच चालली आहे. मात्र या गंभीर परिस्थितीतही कधी आरोग्य कर्मचाऱ्यांचा कर कधी सामान्य नागरिकांचा हलगर्जीपणा समोर येत आहे. अशीच एक घटना कानपूरमध्ये घडली आहे. कानपूर देहातच्या मडौली पीएचसीमध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. या लसीकरणादरम्यान कमलेश देवी नावाची एक महिला लस घेण्यासाठी तेथे गेली होती. या दरम्यान फोनवर व्यस्त असलेल्या एका एएनएम परिचारिकेने या महिलेला एक ऐवजी दोनवेळा कोरोना लसीचा डोस दिला. या हलगर्जीपणाबाबत कमलेश देवी यांनी तक्रार केल्यानंतर एएनएनने आपली चूक मान्यही केली. मात्र यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला.

कमलेश देवी यांच्या म्हण्यानुसार, एएनएम आपल्या मोबाईलवर कोणासोबत तरी बोलत होती. . तिनं फोनवर बोलत बोलतच मला लस दिली. मी तिथंच बसून राहिले आणि तिनंदेखील मला तिथून उठण्यास सांगितलं नाही. फोनवर बोलताना ती हे विसरली की तिनं आधीही मला एकदा लस दिली आहे आणि तिनं मला पुन्हा एकदा लस दिली. यानंतर कमलेश देवींनी विचारणा केली, की लस दोनवेळा दिली जाते का? यावर नर्सने नाही एकदाच दिली जाते, असं उत्तर दिलं. महिलेनं सांगितलं, की तुम्ही मला दोनवेळा लस दिली आहे. यानंतर नर्सच महिलेवर ओरडायला लागली आणि तू उठून का गेली नाही, असा प्रश्न करू लागली. यानंतर महिलेनं सांगितलं, की तुम्ही मला जाण्यासाठी सांगितलं नाही. मला याची माहिती नव्हती की एक लस घ्यायची की दोन. या प्रकारानंतर कमलेश देवी यांचा हात भरपूर सुजला. या घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी एकच गोंधळ केला. यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कारवाईचं आश्वासन देत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.


- Advertisement -

हे वाचा-  चक्क लग्नाच्या दिवशी बनवला वर्ल्ड रेकॅार्ड

- Advertisement -