घरदेश-विदेशलॉकडाऊन: घरातलं रेशन संपलं म्हणून बनला चोर

लॉकडाऊन: घरातलं रेशन संपलं म्हणून बनला चोर

Subscribe

इंदूरमधील एक व्यक्ती घरातील रेशन संपलं म्हणून घरं फोडायला सुरुवात केली.

लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. काहींना घरी जाता येत नाही आहे, काही जणांनी तर नोकऱ्या गमावल्या आहेत, तर अनेकांना खायला अन्न मिळत नाही आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधूनही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. घरातील अन्नधान्य संपलं, कोणतीच मदत त्याच्यापर्यंत पोहोचली नाही म्हणून चोरी करायला सुरुवात केली.

इंदूरच्या वैष्णवधाम कॉलनी स्किम क्रमांक ५१ येथे मंगळवारी संध्याकाळी कुलूप तोडून अज्ञात व्यक्ती घरात घुसला. यानंतर एरोड्रोम पोलिसांना माहिती मिळाली आणि घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना घराचे कुलूप तोडलेले आणि दरवाजा आतून कुलूपबंद असल्याचं दिसल. त्यानंतर, लोकांच्या उपस्थितीत पोलिस घरात शिरले आणि त्यांना घरातील सामान विखुरलेलं आढळलं. त्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला. चोर घरात लपून बसला असता त्याला पोलिसांनी पकडलं. चौकशी दरम्यान चोराने आपली वेदना पोलिसांसमोर मांडली आणि सांगितलं की माझ्या घरात खायला काही नाही. ज्यामुळे मला असं काम करावं लागलं. पोलिसांनी याचा तपास केला असता त्याच्या घराची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी चोराच्या घरात रेशनची व्यवस्था केली आणि मदत केली.

- Advertisement -

पोलिसांकडे चौकशीदरम्यान त्याने सांगितलं की त्याचं नाव रोहित बलाई आहे आणि तो सुंदरनगर बर्फनी धाम येथील रहिवासी आहे. त्याच्या घरी आई आहे आणि लॉकडाउनपूर्वी मिळेल ते काम कुन घर चालवत होतो. परंतु लॉकडाऊनमुळे त्याच्या घरातील रेशन संपलं. सुरुवातीला त्यांना इंदूर महानगरपालिकेकडून मदत मिळाली. परंतु त्यानंतर पुन्हा रेशन संपलं. मग त्यानंतर ओळखीच्या माणसांकडून मदत घेत होतो त्यानंतर ती मदत देखील मिळायची बंद झाली.


हेही वाचा – १ जूननंतर महाराष्ट्र कसा असेल?; यावर मुख्यमंत्री म्हणतात…

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे गरीब आणि मजुरांचे हाल होत आहेत, शिवाय गुन्हेगारीचे प्रमाणही वाढलं आहे. इंदूरमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाचा वाईट परिणाम दिसून आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात दरोडे आणि खून झाल्याची नोंद झाली आहे, तसंच टीव्ही अभिनेत्रीनेही लॉकडाऊनमुळे आत्महत्या केली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -