घरताज्या घडामोडीसुशांतसिंह केसचा 'हे' चार अधिकारी करणार तपास

सुशांतसिंह केसचा ‘हे’ चार अधिकारी करणार तपास

Subscribe

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची पुन्हा शून्यापासून छाननी होणार आहे. विशेष म्हणजे या तपासावर सीबीआयच्या सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याचे नियंत्रण राहणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दररोज नवे वळण मिळत असतानाच आता, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची पुन्हा शून्यापासून छाननी होणार आहे. विशेष म्हणजे या तपासावर सीबीआयच्या सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याचे नियंत्रण राहणार आहे. विशेष म्हणजे सहसंचालक त्यानंतर उपमहानिरिक्षक, उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. तसेच यातील दोन अधिकारी हे गुजरात केडरचे आहे. तर एकजण मूळचे बिहारचे पण केंद्रीय केडरचे असून यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.

सीबीआयचे सहसंचालक असलेले मनोज शशीधर या तपासावर सर्वोच्च देखरेख ठेवणार आहे. ते मूळचे केरळमधील असून १९९४ च्या बॅचचे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली समितीने त्यांची जानेवारी २०२० मध्ये नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या गगनदिप गंभीर या पण केडरच्या २००४ च्या बॅचच्या अधिकारी आहेत. पंजाब विद्यापीठाच्या टॉपर असलेल्या गगनदिप यांनी सीबीआयकडे असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला आहे. विशेष म्हणजे ऑगस्टा वेस्टलँड या हेलिकॉप्टर खरेदीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांनी तपासले आहे.

नुपूर प्रसाद या २००७ च्या बॅचच्या केंद्रीय केडरच्या अधिकारी असून त्या मूळच्या बिहारच्या आहेत. सीबीआयमध्ये येण्यापूर्वी त्या दिल्ली पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहत होत्या.

- Advertisement -

अनिल यादव हे सीबीआयमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदावर काम करत आहेत. मुख्य तपासाचे पुरावे गोळा करण्याचे काम यादव यांची टीम करणार आहे. सीबीआयमध्ये अनेक प्रमुख प्रकरणांचा तपास त्यांनी केला आहे. तसेच त्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळाले आहे.


हेही वाचा – sushant singh -रिया चक्रवर्तीला अटक होणार का? सीबीआय इन Action


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -