घरCORONA UPDATEचोरांनी केली कोरोना रूग्णाच्या घरी चोरी आणि....!

चोरांनी केली कोरोना रूग्णाच्या घरी चोरी आणि….!

Subscribe

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला आता सुरूवात होईल. त्यामुळे सध्या सगळेच घरी आहेत. वर्क फ्रॉर्म सुरू आहे. तर कोणी कुटुंबापासून लांब अडकलं आहे. पण या काळात गुन्हेगारीत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. पण बिहारमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पुन्हा इथे प्रकार घडणार नाही असच दिसतय. कारण चोराला चीरी केल्यानंतर जेल नाही झाली तर त्याला थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं आहे.

बिहारमधील कटिहारच्या कुर्सेला पोलीस स्थानकाजवळ  हा प्रकार घडला आहे. या परिसरातील बिपिन मंडल आणि संतोष मंडल यांनी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरात चोरी केली. मात्र हे चोरी करणारे आरोपी ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आलं.

- Advertisement -

चोरांना केलं क्वारंटाईन

कोव्हिड पॉझिटिव्ह रूग्णाच्या घरात चोरी केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आणि त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं. उपविभागीय पोलीस अधिकारी अमरकांत झा यांनी सांगितले की, कुरसेला पोलीस स्टेशन परिसरातील तीन घारिया गावात एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबियांनाही क्वारंटाइन केले. त्यामुळे घरं रिकामं होतं. त्यामुळे या दोघांनी चोरी करण्याचा प्लॅन रचला. सध्या दोन्ही चोरांवर गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना क्वारंटाइन केले आहे. दोघांचीही पुढील चौकशी आणि कोरोना टेस्ट केली जाणार आहे.


हे ही वाचा – कचऱ्यात सापडलेल्या पीपीई किटशी चिमुरडे दिवसरभर खेळले, आता डॉक्टर म्हणतात…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -