घरदेश-विदेशभारतात अरुणाचल प्रदेश दाखवणारे हजारो नकाशे चीनकडून नष्ट

भारतात अरुणाचल प्रदेश दाखवणारे हजारो नकाशे चीनकडून नष्ट

Subscribe

अरुणाचल प्रदेशाला भारतामध्ये दाखवणारे जवळपास ३० हजार जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले आहे. चीनच्या इशान्येकडील शहरात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी हे नकाशे नष्ट केल्याचे समोर आले आहे.

अरुणाचल प्रदेश आपल्या भूभाग असल्याचा दावा चीन पूर्वीपासून करत आला आहे. तैवानला स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेशाला भारतामध्ये दाखवणारे जवळपास ३० हजार जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले आहे. मागील आठवड्यामध्ये चीनच्या इशान्येकडील शहरात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी हे नकाशे नष्ट केले आहे. प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी चीनकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मागील काही वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.

चीनी कंपनीनेच बनवले नकाशे 

हे नकाशे अनहुई प्रांतातील एका चीनी कंपनीने बनवले होते. हे इंग्लीशमध्ये नकाशे होते. अरुणाचल प्रदेश हा चीनचा हिस्सा असल्याचा दावा चीन करत आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा हिस्सा मानतो. तसेच तेथे भारतीय नेत्यांसह सैन्यालाही जाण्यास चीन विरोध करत असतो. चीनच्या या कृत्याचे इंटरनॅशनल लॉ ऑफ चायना फॉरेन अफेयर्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लियु वेंगजोंग यांनी समर्थन केले आहे. देशाला त्याचे सार्वभौमत्व आणि श्रेत्रीय अखंडता ठेवणे अत्यंत गरजेचे असते, असे म्हटले होते.

- Advertisement -

सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी केले नष्ट 

ग्लोबल टाईम्स या चीन सरकारी वृत्तपत्रातील वृत्तानुसार समजले की, चीनच्या सीमा शुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय नकाशा दर्शविणारे असे ३० हजार नकाशे नष्ट केले आहेत. हे नकाशे कोणत्यातरी देशाला पाठविण्यात येणार होते. त्या देशाचे नाव समोर आलेले नाही. चीनच्या किंग्डाओमध्ये सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी हे नकाशे नष्ट केले आहेत. तसेच चीन-भारत सीमेचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला होता. चीनच्या या कृत्याचे इंटरनॅशनल लॉ ऑफ चायना फॉरेन अफेयर्स युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक लियु वेंगजोंग यांनी समर्थन केले आहे. देशाला त्याचे सार्वभौमत्व आणि श्रेत्रीय अखंडता ठेवणे अत्यंत गरजेचे असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -