घरदेश-विदेशToday Gold silver Price : सोने- चांदी पुन्हा महागली, जाणून घ्या आजचे...

Today Gold silver Price : सोने- चांदी पुन्हा महागली, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

देशात गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सोने चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे या आजही सोने – चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली पाहयला मिळाली. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर ३८० रुपयांनी वाढला तर चांदी तब्बल १२०० रुपयांची महागली आहे. त्यामुळे सोन्यापेक्षा आता चांदीला अच्छे दिन आले आहे. एक किलो चांदीचा दर हा ७३००० रुपयांवर पोहचला आहे.

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ४९ हजार ६७० वर पोहचला आहे. त्यामुळे सोन्याचा दरात ३२१ रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. यापूर्वी सोन्याचा दर ४९७२१ या उच्चांकी स्तरावर पोहचले होते. तर एक किलो चांदी ७३ हजार ०६६ रुपये झाली होती. त्यात आता चांदीच्या दरातही ११६७ रुपयेही विक्रमी वाढ नोंदवण्यात आल्यामुळे चांदीने ७३१०० रुपयांचा पल्ला गाठला आहे.

- Advertisement -

Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २४ कॅरेटचा भाव ४७९०० रुपये असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९०० रुपये इतका झाला. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत आज २०० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यात दिल्लीत आजचा २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०९८० रुपयांवर पोहचला असून २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९८० रुपये आहे. आज चेन्नईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०६०० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी ४६३९० रुपये इतका आहे. यात कोलकात्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०९७० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४९० रुपये झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक महाग सोने सध्या दिल्लीत विकले जात आहे.


French Open : नाओमी ओसाकाने घेतली स्पर्धेतून माघार; सेरेना विल्यम्सचा पाठिंबा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -