घरताज्या घडामोडीदिलासादाक! केबल आणि डीटीएचच्या ग्राहकांना 19 रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एकाच प्लॅनमध्ये...

दिलासादाक! केबल आणि डीटीएचच्या ग्राहकांना 19 रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एकाच प्लॅनमध्ये मिळणार

Subscribe

केबल आणि डीटीएच ग्राहकांसांठी दिलासादाक बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन टॅरिफ ऑर्डर 2.0 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे आता नवे नियम लागू केले जाणार आहे.

केबल आणि डीटीएच ग्राहकांसांठी दिलासादाक बातमी आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन टॅरिफ ऑर्डर 2.0 मध्ये सुधारणा केली आहे. त्यामुळे आता नवे नियम लागू केले जाणार आहे. या नव्या नियमांनुसार, 19 रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एका प्लॅनमध्ये सामील होणार आहेत. (Trai Notifies Amendments To New Tariff Order For Broadcast Sector)

TRAI चे सचिव, व्ही. रघुनंदन यांनी नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार, सर्व वितरक त्यांच्या पे चॅनेलची किंमत निश्चित करताना, प्लॅन असलेल्या सर्व पे चॅनेलच्या किंमतीवर जास्तीत जास्त 45 टक्के सूट देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सध्या फक्त 33 टक्के सूट दिली जाऊ शकते. ट्रायचे म्हणणे आहे की, पे चॅनलची किंमत वितरकाने दिलेल्या सवलतीवर आधारित असेल. दरम्यान, TRAIचे हे नवीन नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहेत. TRAI च्या मते, टेलिव्हिजन चॅनेलचे सर्व वितरक हे निश्चित करतील की, 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत, ग्राहकांना प्लॅन किंवा त्यांनी निवडलेल्या चॅनेलनुसार सेवा प्रदान केल्या जातील. शिवाय, वितरक सर्व चॅनेलचे नाव, भाषा, चॅनेलची दरमहा किंमत आणि चॅनेलच्या प्लॅनची रचना आणि किमती मधील कोणत्याही बदलाचा अहवाल 16 डिसेंबर 2022 पर्यंत देतील.


हेही वाचा – विनायक राऊत, नितीन देशमुखांवर गुन्हे दाखल करा; ‘त्या’ प्रकरणी भावना गवळी आक्रमक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -