घरताज्या घडामोडीतीन महिन्याच्या बाळाच्या शरीरात ३ पेनिस, जगातला पहिलाच प्रकार

तीन महिन्याच्या बाळाच्या शरीरात ३ पेनिस, जगातला पहिलाच प्रकार

Subscribe

इराकमध्ये तीन महिन्यांच्या मुलामध्ये पहिलाच असा आगळा वेगळा प्रकार समोर आला आहे. मानवीय शरीर रचनेमध्ये अवघ्या तीन महिन्यांच्या मुलामध्ये तीन पेनीस (पुरुषाचे जननेंद्रिय) आढळल्याचा ह्युमन ट्रायफलियाचा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारची स्थिती ही एम्ब्रियोचा विकास होतानाच अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इंटरनॅशनल जरनल ऑफ सर्जरी केसमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली आहे. या जर्नलमध्ये इराकच्या या ३ महिन्यांच्या बाळाबाबतची माहिती समोर आली आहे.

इराकच्या डुहॉकच्या ३ वर्षीय बाळाच्या बाबतीत असा प्रकार समोर आला आहे. या बाळाच्या संपुर्ण वाढीमध्ये कोणत्याही औषधाचा निगेटीव्ह असा परिणाम बाळाच्या आईच्या गरोदरपणात दिसला नाही. तसेच या कुटूंबाची कोणताही इतिहास अशा प्रकारच्या जेनेटिक अॅबनॉर्मिलिटीचा नाही. तसेच सायकॉलॉजिकल हिस्टरीदेखील निगेटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. पण आपल्या बाळामध्ये या वेगळ्या गोष्टी आढळल्यानेच हा प्रकार त्यांनी डॉक्टरांच्या निदर्शनास आणला. बाळाच्या शरीर रचनेत डाव्या बाजुला एक जननेंद्रिय आहे. तर दोन आणखी जननेंद्रिय आकाराचा भागही त्याच भागात आहेत. अशा प्रकारचे अतिरिक्त लिंग आढळल्यानेच या बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांकडून घेण्यात आला. त्यामध्ये नेहमीच्या जागेच्या ठिकाणी नसणाऱ्या दोन जननेंद्रियाच्या आकाराचे फेलसेस काढून टाकण्यात आले. तर शरीर रचनेत नेहमीच्या जागेच्या ठिकाणी असणाऱ्या जननेंद्रियावर कोणतीही शस्त्रक्रिया गरजेची नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. शस्त्रक्रियेनंतर त्या बाळाचे आरोग्य चांगले असून त्याला या शस्त्रक्रियेचा कोणताही त्रास होत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

साधारणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये झालेल्या अभ्यासानुसार सरासरी ५० लाख ते ६० लाख मुलांच्या जन्मामागे अशा प्रकारच्या अतिरिक्त जननेंद्रिय असलेली प्रकरणे आढळतात. पण अशा प्रकरणांमध्ये साधारणपणे शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. कारण काही रुग्णांमध्ये अशा स्थितीमुळे रूग्णांनाही आरोग्यासाठीची विशेष काळजी घ्यावी लागते. आतापर्यंत दोन जननेंद्रिय असलेले प्रकार जगभरात समोर आले आहेत. पण तीन जननेंद्रिय असण्याचा प्रकार हा वैद्यकीय क्षेत्रात अतिशय दुर्मिळ असा प्रकार आहे. जगभरात दोन जननेंद्रिय असलेली १०० हून अधिक प्रकरणे आढळली आहेत. पण तीन जननेंद्रियांचा प्रकार हा इराकमध्ये पहिला वहिलाच असाच आहे. याआधी कधीच अशा प्रकारची केस नोंदविण्यात आलेली नाही.

ट्रायफेलिया (तीन जननेंद्रिय) ही परिस्थिती आतापर्यंत मानवी शरीर रचनेत कधीही नोंदवण्यात न आलेली अशी केस आहे. ज्या रूग्णांमध्ये एकाहून अधिक जननेंद्रिय आढळते ते प्रत्येक प्रकरण वेगळे असते. कारण अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय ट्रिटमेंट करण्यातही अतिशय कठीण अशी परिस्थिती असते. त्यामध्ये अनेक गोष्टी सहभागी असल्यानेच या केसेसमध्ये उपचार करणे अतिशय कठीण असते. म्हणूनच अशी प्रकरणे हाताळताना दीर्घकालीन अशी वैद्यकीय स्वरूपाचा फॉलो अप अपेक्षित असतो. अनेकदा अशा प्रकारच्या शस्रक्रियांमध्ये सातत्याने फॉलो अपचीही गरज असते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -