घरCORONA UPDATE'मशिदीत २-३ जणांना प्रवेश पण केदारनाथ मंदिरात १६ जण एकत्र', सोशल मीडियावर...

‘मशिदीत २-३ जणांना प्रवेश पण केदारनाथ मंदिरात १६ जण एकत्र’, सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

केदारनाथमधील प्रसिद्ध देवस्थान केदारनाथ मंदिराचे द्वार २९ एप्रिल रोजी भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत.

केदारनाथमधील प्रसिद्ध देवस्थान केदारनाथ मंदिराचे द्वार २९ एप्रिल रोजी भाविकांसाठी उघडण्यात येणार आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि लॉकडाऊनचा कालावधी असताना मंदिर प्रवेशाबाबतही काही निकष घालून दिले आहेत. मंदिराचे द्वार उघडल्यावर यात मुख्य पुजाऱ्यांसह १६ जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. शिवाय सध्याची परिस्थिती बघता भाविकांना अजूनही मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी प्रशासनाने दिलेली नाही. याबाबतची माहिती रुद्रप्रयागचे डीएम मंगेश घिल्डियाल यांनी दिली आहे. मात्र यावर नेटकऱ्यांनी सरकारवर टीका केली आहे. मश्जिदीमध्ये एकावेळी २ ते ३ जणांना नमाजासाठी परवानगी असताना मंदिरात मात्र एकसाथ १६ जणांना सोडले जात आहे. यावर नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे.

- Advertisement -

वसंत पंचमीच्या दिवसी केदारनाथ मंदिराचे द्वार २९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी उघडण्याचा मुहूर्त निश्चित केला गेला होता. त्यावर मंदिराचे पुजारी ठाम होते. त्यानुसार मंदिराचे द्वार उघडले जाणार आहे. मात्र एएनआयने या संबंधीचे ट्विट केल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना या निर्णयावर टीका केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका ठिकाणी ३ ते ४ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सरकारने मज्जाव केला आहे. असे असताना मंदिरात एकावेळी १६ जणांना प्रवेश कसं देता, यावर नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

CoronaVirus: कोरोनाचा धोका ज्येष्ठांनाच; पालिका करणार स्वतंत्र सर्वेक्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -