Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश ट्विटर वापरकर्त्यांसाठी नवीन बग बनला डोकेदुखी; 3 वर्षांपूर्वी डिलीट केलेले ट्वीट...

ट्विटर वापरकर्त्यांसाठी नवीन बग बनला डोकेदुखी; 3 वर्षांपूर्वी डिलीट केलेले ट्वीट आले समोर

Subscribe

ट्विटरमध्ये एक नवीन बग समोर आला आहे. जो यूजर्सने अनेक वर्षांपूर्वी डिलीट केलेले ट्विट त्यांच्या प्रोफाइलमध्ये दाखवत आहेत. अजून तरी या बगबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Twitter Bug: एकीकडे ट्विटरवर येणारे नवे फीचर्स युजर्सचा अनुभव वाढवत आहेत, तर दुसरीकडे आता एका बगने ट्विटर यूजर्सची डोकेदुखी वाढवली आहे. त्याचं झालं असं की, ट्विटरमध्ये एक नवीन बग समोर आला आहे. जो यूजर्सने अनेक वर्षांपूर्वी डिलीट केलेले ट्विट त्यांच्या प्रोफाइलमध्ये दाखवत आहेत. अजून तरी या बगबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ( Twitter Bug New bug becomes headache for Twitter users Tweets deleted 3 years ago came to light )

ट्विटरवर या बगची माहिती अद्याप समोर आलेली नाही की हा बग कसा आला? परंतु ट्विटर वापरकर्त्यांना त्यांच्या प्रोफाईलवर जुने डिलिट केलेले ट्वीट्स किंवा रीट्विट्स दिसत आहेत का ते तापसण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- Advertisement -

द व्हर्जसाठी काम करणारे पत्रकार जेम्स व्हिन्सेंट म्हणाले की, त्यांनी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ट्वीट हटवले होते, परंतु काही दिवसांनंतर, त्यांना पुन्हा हटवलेले ट्विट्स दिसू लागले, ज्यात 2020 मधील काही ट्विट्स आहेत.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने अद्याप या समस्येशी संबंधित कोणतेही उपाय दिलेले नाहीत. , ट्विटरवर नोव्हेंबर 2020 आणि त्यापूर्वीचे डिलीट केलेले ट्विट पुन्हा दिसू लागल्यामुळे यूजर्सची डोकेदुखी वाढू लागली आहे.

अद्याप काही उपाय नाही 

- Advertisement -

या समस्येवर ट्विटरकडून अद्याप कोणताही उपाय देण्यात आलेला नाही. मात्र, जुने ट्वीट दिसू लागल्याने युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. त्याच वेळी, ट्विटरचे माजी साइट रिलायबिलीटी इंजिनियर म्हणतात की असे दिसते की ट्विटरने सर्व्हरचा मोठा भाग डेटासेंटर्स दरम्यान हस्तांतरित केला आहे.

( हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या हॅरिस पार्कचे नामकरण ‘लिटिल इंडिया’ )

ट्विटरवर गेल्या काही महिन्यांत अनेक त्रुटी समोर आल्या

गेल्या अनेक महिन्यांत एलॉन मस्कच्या ट्विटर प्लॅटफॉर्मवर अनेक समस्या पाहिल्या आल्या आहेत. फेब्रुवारीमध्ये, ट्विटर वापरकर्त्यांना ट्वीट शेअर करण्यात, डायरेक्ट मेसेज पाठवण्यात आणि TweetDeck वापरण्यात अडचणी येत होत्या. यानंतर मार्चमध्ये लिंक ब्रेक होण्याच्या तक्रारी वाढल्या आणि आता या नव्या बगमुळे ट्विटर वापरणाऱ्या युजर्सच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisment -