घरदेश-विदेशभारतात करोनाचे दोन रूग्ण, आरोग्य मंत्र्यालयाकडून दुजोरा!

भारतात करोनाचे दोन रूग्ण, आरोग्य मंत्र्यालयाकडून दुजोरा!

Subscribe

गेले काही दिवस देशात करोनाचीच चर्चा आहे. देशात आणखी दोन करोना व्हायरसचे रूग्ण आढळून आले आहेत. नवी दिल्ली आणि तेलंगणा राज्यात हे करोनाग्रस्त रूग्ण असल्याची माहिती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यापूर्वी करोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून इतरांपासूनपूर्ण वेगळे उपचार करण्यात येत असलेल्या एका रूग्णाचा अर्नाकुलम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.

केरळमधील या रूग्णाला करोनाची लागण झाल्याचे अद्याप सिद्ध झालेलं नाही. जर हे सिद्ध झालं तर तर करोनाने मृत्यू झालेला भारतातील पहिला रूग्ण ठरेल. आता सरकारडून देशात दोन करोनाग्रस्त रूग्ण पॉढिटीव्ह आढळल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक रूग्ण दिल्लीत तर दुसरा रूग्ण तेलंगणात आढळून आला आहे. हा रूग्ण इटलीतून भारतात आलेला आहे. तर तेलंगणातील रूग्ण हा दुबईतून आला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

तर कन्नूर जिल्ह्यातील असलेला हा ३६ वर्षांचा रूग्ण शुक्रवारी रात्री मलेशियातून विमानाने घरी परतला होता. न्युमोनिया, फुप्फुसाचा तीव्र संसर्ग व उच्च मधुमेहामुळे त्याला इस्पितळात दाखल केले गेले होते. या आधीही केरळमध्ये करोना विषाणूचा संसर्ग असलेले तीन रूग्ण आढळले होते. ते चीनमधून आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -