घरमहाराष्ट्रनुपूर शर्मा प्रकरण : लोकांना धमकावणाऱ्या चौघांना अमरावतीत अटक

नुपूर शर्मा प्रकरण : लोकांना धमकावणाऱ्या चौघांना अमरावतीत अटक

Subscribe

अमरावती : भाजपाच्या नुपूर शर्मा प्रकरणावरून अमरावतीमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. त्यावरून भाजपाने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. तथापि, नुपूर शर्मा यांच्या त्या वक्तव्याचे काहींनी समर्थन केले आहे. त्यातूनच अमरावतीमध्ये उमेश कोल्हे तर, उदपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिक कन्हैयालाल यांची हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे.

अशा प्रकरणांचा शोध घेत पोलिसांनी धरपकड सुरू केली असून लोकांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या चौघांना गजाआड करण्यात आले आहे. या चौघांची चौकशी सुरू असून त्यानंतरच त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याचा निश्चित केले जाईल, असे शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निलिमा अराज यांनी सांगितले.
उमेश कोल्हे (54) हत्याप्रकणी पोलिसांनी मुख्य आरोपी इरफान खान (32) याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली असून एनआयएने त्यांना आपल्या ताब्यात घेतले आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -