घरताज्या घडामोडीUkraine-Russian War- पुतिन यांची 'सिक्रेट गर्लफ्रेंड' निशाण्यावर, देशाबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी

Ukraine-Russian War- पुतिन यांची ‘सिक्रेट गर्लफ्रेंड’ निशाण्यावर, देशाबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी

Subscribe

पुतिन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबाईवा (३८) ही पुतिन विरोधकांच्या निशाण्यावर आहे.

युक्रेनवर हल्ला केल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याविरोधात अनेक देश एकवटले आहेत. पुतिन यांना अद्दल घडवण्यासाठी रशियाची आर्थिक कोंडीही करण्यात आली आहे. पुतिन यांना झुकवण्यासाठी अमेरिेकेसह अनेक देश विविध क्लृप्त्या लढवत आहेत. आता तर पुतिन यांची सिक्रेट गर्लफ्रेंड अलिना कबाईवा (३८) (Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva) ही पुतिन विरोधकांच्या निशाण्यावर आली असून तिची देशाबाहेर हकालपट्टी करा अशी मागणी स्वित्झर्लंडमध्ये होत आहे.

अलिना सध्या स्वित्झर्लंडमध्ये असून पुतिन आणि तिच्याविरोधात तेथे हस्ताक्षर मोहिमचं सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळ जवळ ५०.००० हून अधिक नागरिकांनी पुतिन यांची प्रेयसी असल्याने अलिनाला देशाबाहेर हाकलण्याचे समर्थन करत संबधित मोहिमेवर स्वाक्षरी केली आहे. या मोहिमेच्या प्रस्तावावर रशिया आणि युक्रेनमध्ये यु्द्ध सुरू असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एकीकडे युद्ध सुरु असताना स्वित्झर्लंड मात्र पुतिन यांच्या सर्वात जवळील आणि रशियन सरकारसाठी काम करणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करत आहे. असे उपरोधिक वाक्य नमूद करण्यात आले असून अलिनाला स्वित्झर्लंडमध्ये राहण्याचा अधिकार नाही. यामुळे तिची ताबडतोब देशाबाहेर हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी या हस्ताक्षर मोहिमेच्या पत्रकात करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे पोस्टर्सही स्वित्झर्लंडमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

कोण आहे अलिना कबाईवा? Alina Maratovna Kabaeva

अलिना कबाईवा या राजकीय व्यक्ती आहेत. तसेच त्या प्रसिद्ध जिमनॅस्टही आहेत. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये २ पदक, १४ वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक आणि २१ युरोपिय चॅम्पियनशिप पदक मिळवली आहेत. रशियातील सर्वात लवचिक महिला अशी त्यांची ख्याती आहे. अलिना या रशियन संसदेच्या सदस्याही होत्या. त्यांनी पुतिन यांच्या युनायटेड रशिया पार्टीचे प्रतिनिधीत्वही केले होते.

- Advertisement -

‘द गार्डियन’ या ब्रिटीश वृत्तपत्रात अलिना कबाईवा या पुतिन यांच्या प्रेयसी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर पुतिन आणि आलिया यांनी कधीही त्यांच्यामधील नात्यावर भाष्य केलेले नाही. पण असे असले तरी पुतिन यांच्यापेक्षा अलिना या चाणाक्ष आणि स्पष्टवक्त्या आहेत. पुतिन कुठलाही निर्णय घेण्याआधी त्यांच्याशी विचार विनिमय करतात असे सांगितले जाते. यामुळे पुतिन यांच्या विरोधकांनी आता अलिनाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -