घरताज्या घडामोडीदाऊदचा गुंड माजिदच्या मदतनीस इनाम अलीला अटक

दाऊदचा गुंड माजिदच्या मदतनीस इनाम अलीला अटक

Subscribe

सध्या पोलीस इनाम अलीची चौकशी करत असून त्याच्या सध्याच्या पासपोर्टचा शोध घेत आहेत.

काही दिवसांपूर्वीचं गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय गुंड अब्दुल माजिद कुट्टीला अटक केली होती. आता गुंड अब्दुल माजिद कुट्टीला मदत करणारा झारखंड येथील टेल्को बारीनगरचा इनाम अली याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक झाल्यानंतर सध्या त्याची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. सध्या पोलीस त्याचा वर्तमान पासपोर्ट शोधत आहेत. यामुळे आरोपी इनाम किती वेळा मलेशिया गेला आहे हे कळले.

पोलीस चौकशीत इनाम म्हणाला की, तो १९९९ साली मुंबईच्या मार्गाने बनावट पासपोर्टच्या साहाय्याने भारतात परतला होता. त्याचा पासपोर्ट आरोपी गुंड अब्दुल माजिद कुट्टीने तयार केला होता. जेव्हा दुबईमध्ये पासपोर्ट जप्त केला होता तेव्हा तो कुट्टीसोबत राहत होता. कुट्टीच्या मित्रांची त्यांच्यासोबत भेट होत होती. परंतु तो त्यांना ओळखत नव्हता. त्या अनोळखी लोकांनी त्याचा बनावट पासपोर्ट तयार करू दिला. या पासपोर्टच्या मदतीने मुंबईत आला होता. अब्दुल माजिद कुट्टीचे दाऊदच्या टोळीशी संबंध आहे, हे इनामला माहित होतो. त्याने घाबरून पोलिसांपासून ही गोष्ट लपवली होती.

- Advertisement -

पोलिस रात्रभर इनाम अलीचे चौकशी करत होती. पोलिसांना कुट्टीच्या स्थानिक संपर्काबाबत अधिक माहिती मिळाली. कुट्टीला भेटणाऱ्या तरुणींची नावे त्याने सांगितले. एसएसपी तामिल वाणनने सांगितले की, इनामाचा दाऊदच्या टोळीशी संबंध असल्याचे आढळले आहे. कुट्टीला जमशेदपुर घेऊन येण्यात त्याचा हात होता आणि त्यासोबत हात मिळवणी करून त्याने बनावट पासपोर्ट तयार केला होता. त्याने अनेक गोष्टी पोलिसांपासून लपवल्या आहेत. याच्या आधार पोलीस सध्या कारवाई करत आहे. यासाठी एक पथकाची स्थापना केली आहे. पथकाचा अहवाल येताच त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.


हेही वाचा – दाऊदच्या आणखी एका मालमत्तेचा लिलाव; १.१० कोटीच्या बोलीवर खरेदी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -