घरताज्या घडामोडीन्यायपालिका आणि निवडणूक आयोगावरील वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत, कायदे मंत्र्यांकडून माफीची मागणी

न्यायपालिका आणि निवडणूक आयोगावरील वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत, कायदे मंत्र्यांकडून माफीची मागणी

Subscribe

राहुल गांधी बुद्धिहीन आणि गोंधळलेले आहेत. भारत फक्त एक देशा नाही असे राहुल गांधी सांगत चीनला पाठींबा देत होते. या व्यक्तीने संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश फाढून मोदींबद्दल बोलत आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केला आहे. अर्थसंकल्प अधिवेशनात तिसऱ्या दिवशी खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. न्यायपालिका, निवडणूक आयोग आणि पेगाससच्या मुद्द्यावरुन लोकसभेत राहुल गांधींनी भाजपवर टीकास्त्र डागलं. राहुल गांधींच्या आरोपांवरुन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माफीची मागणी केली आहे. तसेच संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे की, भारताच्या कायदा मंत्री म्हणून नाही तर सामान्या नागरिक म्हणूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करतो. आपल्या लोकशाहीतील महत्त्वाच्या संस्थांवर राहुल गांधींनी आरोप केले आहेत. न्याय पालिका आणि निवडणूक आयोगाची राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे.

- Advertisement -

राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

खासदार राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इज्रायल दौरा केला आणि हेरगिरी करण्यासाठी पेगासस सॉफ्टवेअरची खरेदी केली. सरकारने सर्व संस्थानांवर वर्चस्व मिळवले आहे. राहुल गांधींना या मुद्द्यांवर बोलण्यापासून रोखण्यात आले, कारण झारखंडच्या गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आक्षेप घेतला होता. पेगाससचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन आहे. यामुळे संसदेत त्यावर चर्चा होऊ नये असे निशिकांत दुबे यांनी म्हटलं होते.

राहुल गांधीचे वक्तव्य अहंकारी – प्रल्हाद जोशी

राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधींना बोलण्याची संधी देण्यात येते कारण ते गांधी परिवाराचे सदस्य आहेत. त्यांच्यामधील अहंकार असे वक्तव्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या स्थानी बसले आहेत. त्यावरुन राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराला वाटत आहे की ती जागा माझी आहे. राहुल गांधी बुद्धिहीन आणि गोंधळलेले आहेत. भारत फक्त एक देशा नाही असे राहुल गांधी सांगत चीनला पाठींबा देत होते. या व्यक्तीने संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश फाढून मोदींबद्दल बोलत आहेत.

- Advertisement -

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची प्रतिक्रिया

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, राहुल गांधींनी लोकसभेत आरोप केले की पाकिस्तान आणि चीन सरकारमुळे एकत्र आले आहेत, तर इतिहासाचे धडे याच क्रमाने आहेत. 1963 मध्ये पाकिस्तानने बेकायदेशीरपणे शक्सगाम व्हॅली चीनच्या ताब्यात दिली. यानंतर 1970 च्या दशकात चीनने पीओकेमधून काराकोरम हायवे बनवला. त्याच वेळी, 1970 च्या दशकापासून चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अण्वस्त्र सहकार्य आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर 2013 मध्ये सुरू झाला. मग, स्वतःला विचारा, तेव्हा चीन आणि पाकिस्तान दूर होते का?


हेही वाचा : Weather Update : राजधानी दिल्लीत अवकाळी पावसामुळे थंडीची लाट; जाणून घ्या उर्वरित राज्यांची स्थिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -