घरताज्या घडामोडीरुग्णवाहिकेच्या चालकाला लागली डुलकी अन् 7 जणांनी गमावला जीव

रुग्णवाहिकेच्या चालकाला लागली डुलकी अन् 7 जणांनी गमावला जीव

Subscribe

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) परिसरात ट्रक आणि रुग्णवाहिकेच्या (Ambulance) धडकेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रग्णवाहिकेच्या चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाला.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बरेली (Bareilly) परिसरात ट्रक आणि रुग्णवाहिकेच्या (Ambulance) धडकेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रग्णवाहिकेच्या चालकाला झोप अनावर झाल्याने हा अपघात झाला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, राममूर्ती रुग्णालयाची (Rammurti Hospital) ही रुग्णवाहिका होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-लखनऊ राष्ट्रीय महामार्गावर (Delhi-Lucknow National Highway) दिल्लीहून एक रुग्णवाहिका येत होती. या रुग्णवाहिकेत 7 जण बसले होते. हे सातही जण पीलीभितचे (Pilibhit) रहिवासी असून, दिल्लीहून (Delhi) तपासणी करून परतत होते. त्यावेळी राममूर्ती रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेच्या चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला आणि रुग्णवाहिका थेट बरेलीहून दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला धडकली. या धडकेत रुग्णवाहिकेत असलेल्या 7 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरूषांचा समावेश आहे.

- Advertisement -

मार्गावरील वाहतूक सुरळीत

या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एसपी ग्रामीण राजकुमार अग्रवाल म्हणाले की, रुग्णावाहिका घटनास्थावरून बाजूला काढण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे. दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची ओळख पटवून माहिती देण्यात आली आहे. मृतांमध्ये सहा जण पिलीभीतचे रहिवासी आहेत तर रुग्णवाहिकेचा चालक बरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे.

- Advertisement -

दरम्यान, पोलीस आणि राममूर्ती रुग्णालय या अपघाताच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; शवविच्छेदनाच्या अहवालात मोठा खुलासा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -