घरAssembly Battle 2022UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये विकास आणि सुशासनाला जनतेचा आशीर्वाद,...

UP Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये विकास आणि सुशासनाला जनतेचा आशीर्वाद, योगी आदित्यनाथांनी मानले मतदारांचे आभार

Subscribe

आम्ही सर्व राज्यातील 25 कोटी लोकांसाठी आमची जबाबदारी पार पाडू असे योगी म्हणाले आहेत. तसेच निम्मी लोकसंख्या, माता-भगिणींनी भाजपला प्रचंड बहुमत दिलं असून त्यांचा आभारी असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी मानले आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बहुमत मिळाल्यानंतर योगींनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. प्रधानमंत्री मोदींच्या यशस्वी नेतृत्वात आज संपूर्ण देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणीपूर आणि गोव्यात भाजपची बहुमताची सरकार स्थापन होणार आहे. या चार राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास आणि सुशासनाला लोकांनी स्वीकारले असून आपला आशीर्वाद दिला आहे. सगळ्यात पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी , राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्ड , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. ज्यांच्या नेतृत्वामध्ये भाजप प्रचंड मतांनी निवडून आली आहे. उत्तर प्रदेश देशात लोकसंख्येच्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे राज्य आहे. यामुळे देशातील सगळ्यांच्या नजरा या निकालाकडे होत्या. भाजपचे पदाधिकारी आणि अपना दल एस आणि निषाद पार्टी उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमत मिळवलं आहे. या बहुमतासाठी उत्तरप्रदेशच्या जनतेचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला वेळ दिला. आपल्याला होशमध्ये जोश गमावून चालणार नाही असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

सुशासन मॉडलचा उल्लेख

हा विजय प्रचंड बहुमत राष्ट्रवाद, विकास आणि सुशासनच्या मॉडलला यूपीच्या जनतेनं दिलेला आशीर्वाद आहे. याचा स्वीकार करुन लोककल्याणासाठी काम करणार असल्याचे योगी म्हणाले आहेत. तसेच पुढे वाटचाल करु, भाजपने उत्तर प्रदेशमध्ये मागील ५ वर्षांपासून सुरक्षेचे वातावरण निर्माण केलंय तुम्ही ते पाहिलेसुद्धा आहे. श्रद्धेला मान दिला, विकास कामे केली, गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

- Advertisement -

जनेतनं घराणेशाहीला तिलांजली दिली

लोकांनी घराणेशाही, जातीवाद आणि घराणेशाहीचे राजकारण सोडून भाजपला बहुमत दिलं आहे. कोरोना काळात भाजप कार्यकर्त्यांनी न थांबता अथक परिश्रम घेतले. यामुळे प्रत्येक कार्यकर्ता विजयासाठी पात्र आहे. ५ वर्षांमध्ये जे काम केले त्याचे परिणाम आता सर्वांसमोर आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४५ लाख लोकांच्या घरात वीज जोडणी आणि रेशन देणार असल्याची घोषणा योगींनी केली आहे.

तीन आघाड्यांशी भाजपने लढा दिला

उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा कोरोना, भ्रष्टाचार आणि अप्रमाणिकपणाशी भाजप लढत होता. त्या काळात विरोधक भाजपविरोधात षडयंत्र म्हणून काम करत होते. त्या लोकांची बोलती बंद करण्याचे काम जनतेन पुन्हा एकदा केले आहे. राष्ट्रवाद, सुशासन आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजपला जनतेनं बहुमत दिलंय यामुळे ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. असे योगींनी म्हटलं आहे.

- Advertisement -

जय श्री राम जयघोषाने भाषणाचा समारोप करताना योगी म्हणाले की, पीएम मोदींच्या मार्गदर्शनाखाली यूपी देशाचे प्रथम क्रमांकाचे राज्य बनेल. आम्ही सर्व राज्यातील 25 कोटी लोकांसाठी आमची जबाबदारी पार पाडू असे योगी म्हणाले आहेत. तसेच निम्मी लोकसंख्या, माता-भगिणींनी भाजपला प्रचंड बहुमत दिलं असून त्यांचा आभारी असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी मानले आहेत.


हेही वाचा : Election Result 2022 : शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, पण मतं मात्र नोटापेक्षा कमी, देवेंद्र फडणवीसांचा टोला

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -