घरताज्या घडामोडीसब इन्स्पेक्टरच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तक्रार दाखल करताच पीडितेच्या वडिलांचा मृत्यू

सब इन्स्पेक्टरच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तक्रार दाखल करताच पीडितेच्या वडिलांचा मृत्यू

Subscribe

देशात महिला, तरुणींवर होणाऱ्या बलात्कार घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिना दिवशीच एका तरुणीवर सलग आठ दिवस नऊ जणांनी बलात्काराची राजस्थानमधील घटना समोर आली होती. आता त्यानंतर कानपूरमध्येही खळबळजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एक १३ वर्षांच्या मुलीच्या वडिलांनी तिच्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराविरोधात तक्रार दाखल केली होती. पण तक्रार दाखल करताच दोन दिवसानंतर बुधवारी सकाळी एका रुग्णालयाच्या बाहेर वडिलांची रोड अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेले होते.

दरम्यान याप्रकरणी तिच्या गावातील तीन लोकांची नावे घेतली जात आहेत. मुख्य आरोपी गोलू यादवचे वडील उत्तर प्रदेश पोलिसात सब इन्स्पेक्टर आहे. कानपूरपासून १०० किलोमीटर दूर कन्नौज जिल्ह्यात ते तैनात आहेत. याप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आले आहे. दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप लावले आहेत. कुटुंबियांचे म्हणणे आहे की, ‘तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी कुटुंबाने आम्हाला धमकावले. पोलीस याप्रकरणात एकमेकांना मिळाली आहे.’

- Advertisement -

पीडितेच्या आजोबांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना आरोप लावले की, ‘माझी मुलीची हत्या केली गेली आहे. पोलिसांचा यामध्ये एकमेकांना हात आहे.’ तसेच इतर कुटुंबातील लोकांनी सांगितले की, ‘जशी आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली, त्या दिवसापासून आरोपाचा मोठा भाऊ आम्हाला धमकावू लागला. माझे वडील सब-इन्स्पेक्टर आहेत, सावध राहा.’

कानपूरच्या पोलीस चीफ डॉक्टर प्रीतिंदर सिंह यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपले स्टेटमेंट जारी करून सांगितले की, ‘जेव्हा वैद्यकीय तपासणी सुरू होती, त्यावेळेस मुलीचे वडील चहा पिण्यासाठी बाहेर गेले होते. मग आम्हाला कळाले की, त्याचा ट्रक अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांना त्वरित कानपूर रुग्णालयात घेऊ गेले होते, परंतु त्यांचा मृत्यू झाला. आम्ही अपघाताची तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे.’

- Advertisement -

मंगळवारी कानपूर पोलिसांनी वडिलांच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि आरोपीचा दबाव या आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता. कानपूर पोलिसातील एक वरिष्ठ अधिकारी बृजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘वडिलांनी तक्रार दाखल केली होती आणि आम्ही लगेच त्यावर कारवाई केली. पीडित मुलगी ठिक आहे. आम्ही याप्रकरणाच्या चौकशीसाठी पाच जणांच्या टीमची स्थापना केली आहे.’


हेही वाचा – धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर सलग आठ दिवस नऊ जणांनी केला बलात्कार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -