घरताज्या घडामोडीधक्कादायक! अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक

धक्कादायक! अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक

Subscribe

अमेरिकेतील डलास एक एयर शोच्या दरम्यान अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक झाल्याने दोन्ही विमान लगेचच जमिनीवर पडले आणि स्फोट होऊन त्यांचे तुकडे-तुकडे झाले.

अमेरिकेतील डलास एक एयर शोच्या दरम्यान अमेरिकन वायूसेनेच्या दोन विमानांची हवेतच धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक झाल्याने दोन्ही विमान लगेचच जमिनीवर पडले आणि स्फोट होऊन त्यांचे तुकडे-तुकडे झाले. यूएस फेडर एविएशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या हवाल्याने याचे वृत्त देण्यात आले आहे. (us Dallas two world war era planes collide in midair during Texas airshow)

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, शनिवारी अमेरिकेतील डॅलस येथे वर्ल्ड वॉर-2 स्मरणार्थी एअरशो आयोजित करण्यात आला होता. हा शो पाहण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती. एअर शो सुरू असताना अचानक बोईंग बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस बॉम्बरची दुसऱ्या बेल पी-63 किंगकोब्रा फायटरशी समोरासमोर टक्कर झाली.

- Advertisement -

डॅलस एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर विमानातील क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात येत आहे. दोन्ही विमानात किती लोक होते हे सध्या स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर दिली.

हँक कोट्स, स्मरणार्थी हवाई दलाचे (CAF) अध्यक्ष आणि सीईओ, द्वितीय विश्वयुद्धाच्या लढाऊ विमानांचे संरक्षण करण्यासाठी समर्पित गट, यांनी स्पष्ट केले की B-17 मध्ये सामान्यत: चार ते पाच लोकांचा क्रू असतो. कोट्स म्हणाले की पी-63 मध्ये एकच पायलट होता, परंतु अपघाताच्या वेळी विमानात इतर किती लोक होते हे त्यांनी सांगितले नाही.

- Advertisement -

या विमान अपघाताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शो मध्ये सहभागी लोकांद्वारे हा व्हिडिओ कॅप्चर करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि तो अधिकाधिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. या व्हिडिओत एका मोठे विमान सरळ रेषेत उडत आहे. ते जमिनीपासून खूप उंचावर नाही. असे दिसते. त्याच वेळी एक छोटे विमान आपली दिशा बदलून डाव्या बाजूने येते आणि ते सरळसरल या मोठ्या विमानावर आदळून त्याचे तुकडे-तुकडे होतात. त्यामुळे मोठे विमान खाली जमिनीवर येऊन स्फोट होऊन त्याचेही तुकडे तुकडे होतात.


हेही वाचा – हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान, फायदा कोणाला?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -