घरताज्या घडामोडीCoronaVirus: कोरोनापासून बचाव करण्यासाठी एसीचे तापमान २४ ते ३० डिग्री दरम्यान ठेवा!

CoronaVirus: कोरोनापासून बचाव करण्यासाठी एसीचे तापमान २४ ते ३० डिग्री दरम्यान ठेवा!

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे एसी वापरासंदर्भात मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती लक्षात घेऊन एसीचे तापमान २४ ते ३० डिग्री दरम्यान असणे आवश्यक आहे. इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनर इंजिनिअर्सने तयार केलेले १८ पानचे मार्गदर्शन सूचना केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या महामारी दरम्यान घरातील एसीचे तापमान २४ ते ३० डिग्री सेल्सियस दरम्यान असावे. तसेच आर्द्रता ४० ते ७० टक्के इतकी असावी. यादरम्यान एसीचा काळजीपूर्वक वापर करण्याचा सल्ला संसर्ग तज्ज्ञ देत आहेत.

एक्झॉस्ट फॅनचा वापर करणे आवश्यक

एसीमुळे कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याचा घटना समोर आल्या आहेत. एसी खूप दिवसांनंतर वापर करत असाल तर पहिल्यांदा तिचे सर्व्हिसिंग करणे महत्त्वाचे आहे. त्या जागेवर जास्तीत जास्त जंतू असतात. घरात एसीचा वापर करताना खिडक्या थोड्या उघड्या ठेवाव्यात. या वेळी एक्झॉस्ट फॅनचा वापर करावा. वातानुकूलित यंत्र बंद असेल, तेव्हाही घरात ‘व्हेंटीलेशन’आवश्यक आहे, असे यामध्ये सुचवण्यात आले आहे. तसंच  जर कूलर वापरत असला तर बाहेरील हवा येण्यासाठी ५० टक्के दार किंवा खिडकी उघडी ठेवा. गरम हवा बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचा वापर करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: एसीमुळे रेस्टॉरंटमध्ये कोरोनाचा फैलाव!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -