घरताज्या घडामोडीऋषभ पंतसाठी देवदूत ठरलेल्या 'त्या' दोघांचा प्रजासत्ताकदिनी होणार सत्कार; सरकारची घोषणा

ऋषभ पंतसाठी देवदूत ठरलेल्या ‘त्या’ दोघांचा प्रजासत्ताकदिनी होणार सत्कार; सरकारची घोषणा

Subscribe

एकिकडे ऋषभची स्थिर प्रकृती तर, दुसरीकडे ऋषभला या अपघातातून जीवदान देणाऱ्यांवर सर्वच स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे. कारण जळत्या कारमधून बाहेर काढत दोन तरुणांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या दोन तरुणांचा प्रजासत्ताकदिनी भव्य सत्कार करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंतचा दिल्ली-रुडकी महामार्गावर भीषण कार अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ऋषभची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकिकडे ऋषभची स्थिर प्रकृती तर, दुसरीकडे ऋषभला या अपघातातून जीवदान देणाऱ्यांवर सर्वच स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे. कारण जळत्या कारमधून बाहेर काढत दोन तरुणांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या दोन तरुणांचा प्रजासत्ताकदिनी भव्य सत्कार करण्याचा निर्णय उत्तराखंड सरकारने घेतला आहे. (uttarakhand government felicitat sushil singh on 26 january 2023 for tried to save cricketer rishabh pant after his car accident)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

दिल्लीतून पहाटे उत्तराखंडमधील रुडकीच्या दिशेने ऋषभ पंत निघाला होता. एकटाच असल्याने ऋषभ स्वत: कार चालवत होता. त्यावेळी कार चालवत असताना पंतला अचानक डुलकी आली आणि त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. परिणामी भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला धडकली. कार भरधाव असल्याने धडकल्यानंतर लगेचच गाडीने पेट घेतला. ऋषभच्या अपघातानंतर त्याठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेल्या बसच्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी घटनास्थळी धाव घेत ऋषभ पंतला जळत्या गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर या तरुणांनी रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर पंतला पहिल्यांदा नजीकच्या आणि त्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ऋषभसाठी देवदूत ठरलेल्या या दोन तरुणांचे मोठ्या प्रमाणात सर्वच स्तरावरून कौतुक केले जात असून, त्यांचा शासनातर्फे सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा उत्तराखंडचे परिवहनमंत्री मूलचंद शर्मा यांनी केली आहे.

- Advertisement -

टिम इंडियाच्या आगामी दौऱ्यासाठी संघात निवड न झाल्यामुळं ऋषभ दिल्लीतील काम आटोपून घराच्या दिशने पहाटे निघाला होता. परंतु घरी येत असल्याची माहिती त्याने कुटुंबियांना दिलेली नव्हती. थेट घरी जाऊन आपल्या आईला सरप्राइज देण्याचा प्लॅन त्याने आखला होता. परंतु त्याची झोप पूर्ण न झाल्यामुळे त्याचा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

या अपघातात पंतच्या मानेला आणि पाठीला गंभीर मार लागलेला असून त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पंत दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे आता तो भविष्यात क्रिकेट खेळू शकणार की नाही, यावर प्रश्निचन्ह उपस्थित केले जात आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राला सलग आठवा दुहेरी मुकुट; कुमारांचे ३३ वे तर मुलींचे २४ वे अजिंक्यपद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -