निवडणुकीत एका मताने हरला, पण प्रतिस्पर्धी उमेदवारासह सारा मतदारसंघ जिंकला; वाचा नेमके प्रकरण काय?

निवडणुकीत एका हरलेल्या उमेदवाराचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. हरयाणातील हा प्रकार असून, पराभूत करणाऱ्यांनीच भरभरून मानधन देत हरलेल्या उमेदवाराचा सत्कार केला आहे.

निवडणुकीत एका हरलेल्या उमेदवाराचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. हरयाणातील हा प्रकार असून, पराभूत करणाऱ्यांनीच भरभरून मानधन देत हरलेल्या उमेदवाराचा सत्कार केला आहे. या हरलेल्या उमेदवाराला जमीन, चारचाकी व लाखो रुपये देत त्याचा गौरव केला. (Villagers gave land car and Rs 11 lakh to Sundar Kumar who lost the Sarpanch election by one vote)

नेमके प्रकरण काय?

हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील नाधोडी गावाने बंधुभावाचे हे आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले सुंदर कुमार एका मताने पराभूत झाले. त्यांना पराभवाचे शल्य वाटू नये म्हणून ग्रामस्थांनी त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित करून त्यांना ११ लाख ११ हजार रुपये रोख, एक स्विफ्ट डिझायर कार व पाव एकर जमीन भेट म्हणून दिली.

नाघोडी गावात ७१ वर्षांनंतर प्रथमच अनुसूचित जातीचा सरपंच झाला आहे. या निवडणुकीत नरेंद्र एका मताच्या फरकाने विजयी झाले. नाधोडी गावात एकूण ५०८५ मते आहेत. यापैकी ४४१६ जणांनी मतदान केले.

या निवडणुकीत सुंदर कुमार यांना २२०० आणि नरेंद्र यांना २२०१ मते मिळाली. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सुंदर यांचा जाहीर सत्कार करून गावकऱ्यांनी अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे.


हेही वाचा – मनसेत नाराजी; पुण्याचे वसंत मोरे भाषण करू न दिल्याने नाराज