घरताज्या घडामोडीयामुळे व्लादिमीर पुतिन सोडणार राष्ट्रपतीपद?

यामुळे व्लादिमीर पुतिन सोडणार राष्ट्रपतीपद?

Subscribe

२० वर्षांपासून रशियात सत्ते असलेले आणि जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक मानले जाणारे व्लादिमीर पुतिन राष्ट्रपतीपद सोडणार असल्याचे समोर आले आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच व्लादिमीर पुतिन राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांना रशियाचे राष्ट्रपती पद सोडण्याचे आवाहन त्यांची गर्लफ्रेंड अलिना कबाइला आणि दोन मुलींनी केले आहे.

यामुळे सोडणार व्लादिमीर पुतिन देणार पदाचा राजीनामा

सध्या व्लादिमीर पुतिन पार्किसन्स आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना झालेल्या या आजाराची लक्षणे अलीकडच्या काही फोटोंमधून दिसत आहेत. द सन या ब्रिटीश वृत्तपत्राला मॉस्कोमधील राजकीय विश्लेषक वलेरी सोलोवेई यांनी सांगितले की, ‘पुतिन यांची गर्लफ्रेंड आणि दोन मुली त्यांच्यावर पद सोडण्यासाठी दबाव आणत आहेत. पुतिन यांच्या कुटुंबातील सदस्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात पुतीन अन्य कोणाकडे आपले पद सोपवू शकतात. त्यांना पार्किसन्स आजार असून सध्याच्या फोटोंमध्ये त्याच्या आजाराची लक्षणे दिसून येत आहे.’

- Advertisement -

नुकताचा पुतिन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते आपल्या पायांची हालचाल इकडून तिकडे करताना दिसून आले होते. फौजदारी कारवाईपासून आजन्म सूट पुतिना यांना देण्यासंबंधीचे विधेयक संसदेत दाखल करण्याचा विचार सुरू आहे. त्यादरम्यानचे पुतिन यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, असे द सनच्या तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.


हेही वाचा – ‘या’ राज्याला शाळा सुरू करणं पडलं महाग! २६२ विद्यार्थी आणि १६० शिक्षक झाले कोरोनाबाधित!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -