घरदेश-विदेशआमचे विचार न पटणारे देशद्रोही नाहीत

आमचे विचार न पटणारे देशद्रोही नाहीत

Subscribe

सत्ताधारी भाजपचे भीष्म पितामह आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी 6 एप्रिलला साजरा करण्यात येणार्‍या भाजपच्या स्थापना दिवसाच्या पार्श्वभुमीवर एक ब्लॉग लिहिला आहे. या लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेल्या अडवाणी यांनी पहिल्यांदाच आपल्या ब्लॉगवरून पक्षाच्या सध्याच्या कार्यपध्दतीवर टीका केली आहे. भाजपने राजकीय विरोधकांना कधीच दुश्मन मानले नाहीत. जे आमच्याशी सहमत नाहीत, त्यांना देशद्रोही कधीच म्हणालो नाही, असे नमूद करून त्यांनी कानपिचक्या दिल्या आहेत.

तिकीट नाकारल्यानंतर अडवाणी यांनी आपल्या वेदना ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. भाजप ६ एप्रिलला स्थापना दिवस साजरा करेल. हा क्षण भाजपमध्ये सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. आम्ही थोडे मागे पाहिले पाहिजे, पुढे पाहताना आजूबाजूलाही पाहिले पाहिजे. भाजपच्या संस्थापक असणार्‍यांपैकी एक मी पण होतो. या भूमिकेतून देशातील जनतेशी अनुभव कथन करणे कर्तव्य समजले. पक्षासह या सर्वांनी मला स्नेह आणि सन्मान दिला असल्याचे त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

अडवाणी यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील नागारिकांचेही आभार मानले आहेत. मातृभूमीची सेवा करणे हे माझे मिशन होते. मी १४ वर्षांचा होतो त्यावेळी मी आरएसएसमध्ये दाखल झालो होतो. सत्तर वर्ष मी पक्षाशी अविभाज्यपणे जोडला गेलो आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी अशा दिग्गज नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली,असे अडवाणी यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -