घरताज्या घडामोडीपश्चिम बंगाल विधानसभेत तुफान राडा, हाणामारीत तृणमूलचे आमदार जखमी

पश्चिम बंगाल विधानसभेत तुफान राडा, हाणामारीत तृणमूलचे आमदार जखमी

Subscribe

पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये आज तुफान राडा झाला. यावेळी भाजपचे आमदार मनोज तिग्गा आणि तृणमूलचे आमदार असित मजुमदार यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यात जखमी झालेल्या असित मजुमदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले .

या राड्यानंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले. या निलंबित आमदारांमध्ये शुभेंदु अधिकारी, मनोज तिग्गा, नराहरी महतो, शंकर घोष, दीपक बरमन यांचा समावेश आहे. पुढील आदेश येईपर्यंत या पाच जणांचे निलंबन करण्यात आले आहे. बंगाल विधानसभा बजेटचा आज सोमवारी शेवटचा दिवस असून हाणामारीनंतर संतप्त भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. दरम्यान, बीरभूमच्या घटनेवर चर्चा करण्याची आम्ही मागणी केली होती पण त्यावर तृणमूल आमदारांनी गोंधळ घालत आम्हाला मारहाण केली असा आरोप भाजपच्या आमदारांनी केला आहे.

- Advertisement -

राड्यानंतर भाजपचे आमदार ममोज तिग्गा यांनी विधानसभेबाहेर जोरदार निदर्शने केली. तृणमूलच्या आमदारांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच माझे शर्टही फाडले असेही तिग्गा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेता शुभेंदु अधिकारी यांनीही विधानसभेबाहेर जोरदार नारेबाजी केली. तसेच मुखमंत्री ममता बॅनर्जी यासाठी जबाबदार असल्याचा आरोप यावेळी भाजपच्या आमदारांनी केला. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते बीएल संतोष यांनी ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यापासून बंगालच्या राजकारणाचा स्तर खालावल्याचा आरोप केला.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -