पश्चिम बंगालमध्ये भररस्त्यात गोळीबार, टीएमसीच्या नेत्यासह तिघांचा मृत्यू

टीएमसी नेता स्वपन माझी आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन जणांवर अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या. त्यामुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Elderly man fires at daughter-in-law for not serving breakfast with tea

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ( TMC) नेत्यासह तिघांची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील गोपालनगर येथे ही घटना आज सकाळी घडली आहे. टीएमसी नेता स्वपन माझी आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन जणांवर अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या. त्यामुळे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. (West bengal three inlcuding a tmc leader shot dead in south 24 pargana)

हेही वाचा – शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्या, त्यांचा योग्य पाहुणचार करू – ममता बॅनर्जी

दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील कॅनिंगमध्ये स्वपन माझी आपल्या दोन सहकाऱ्यांसह बाईकने जात होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांची बाईक थांबवून तिघांवर अंधाधुंद गोळीबार केला. सुरुवातील स्वपन माझी यांना लक्ष करण्यात आलं. त्यांना गोळी लागताच ते जागच्या जागी मृत पावले. त्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – पश्चिम बंगाल विधानसभेत तुफान राडा, हाणामारीत तृणमूलचे आमदार जखमी

स्वपन माझी हे पंचायत सदस्य होते. मात्र, त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली, हल्लेखोर कोण होते, याची अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.