घरताज्या घडामोडीNeoCov: चीनच्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या निओकोव्ह कोरोना व्हायरसबाबत WHO काय म्हणाले?

NeoCov: चीनच्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या निओकोव्ह कोरोना व्हायरसबाबत WHO काय म्हणाले?

Subscribe

चीनच्या संशोधनकर्त्यांनी आपल्या शोधाचा प्रीप्रिंट सादर केल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आभार व्यक्त केले आहेत.

दक्षिण आफ्रिकेमधील वटवाघळांमध्ये कोरोनाचा नवा अवतार सापडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या वुहान मधील संशोधकांच्या एका टीमला दक्षिण आफ्रिकेच्या वटवाघळांमध्ये कोरोनाचा अवतार आढळला आहे. कोरोनाच्या या नव्या अवताराला निओकोव्ह (NeoCov) असे नाव देण्यात आले आहे. हा व्हायरस येत्या भविष्यात मनुष्यासाठी धोका निर्माण करू शकतो, असे चीनच्या वैज्ञानिकांच्या अध्ययनात म्हटले आहे. कोरोना व्हायरसचे एक मोठे कुटुंब आहे, जे सामान्य सर्दीपासून ते गंभीर श्वसन सिंड्रोम (SARS) पर्यंत आजाराचे कारण ठरतात. जागतिक आरोग्य संघटना कोरोनाच्या नव्या अवताराबाबत म्हणाली की, ‘या संशोधनाबाबत माहित आहे. परंतु हा व्हायरस खरंच मनुष्यासाठी धोकादायक असू शकतो का? यासाठी आणखीन अध्ययन करण्याची आवश्यकता आहे.’

रशियन वृत्तसंस्था TASSने देखील सांगितले की, ‘हा नवा व्हायरस मनुष्यासाठी धोका निर्माण करू शकेल का नाही? यासाठी अध्ययन करणे गरजेचे आहे.’ तसेच जागतिक आरोग्य संघटना पुढे म्हणाली की, ‘जंगली प्राणी मुनष्यांमध्ये ७५ टक्के संसर्गजन्य रोग पसरवण्याचा स्रोत असतो. सर्वसाधारणपणे कोरोना व्हायरस प्राण्यांमध्ये आढळतो. ज्यामध्ये वटवाघळांचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान चीनच्या संशोधनकर्त्यांनी आपल्या शोधाचा प्रीप्रिंट सादर केल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आभार व्यक्त केले आहेत. अध्ययनानुसार, निओकोव्ह कोरोनाप्रमाणेच मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो. दरम्यान मनुष्यासाठी निओकोव्ह धोकादायक होण्यापासून फक्त एक म्यूटेशन दूर आहे, असे प्रीप्रिंट रिपॉझिटरी बायोरेक्विववर पोस्ट केलेल्या या अभ्यासात संशोधकांनी हे सांगितले आहे.


हेही वाचा – Coronavirus : देशात कोरोना रुग्णसंख्या होतेय कमी, पण मृतांची संख्या का वाढतेय? जाणून घ्या कारण

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -