आता लहान मुलांनाही मिळणार लस, Covavaxच्या आपत्कालीन वापरासाठी WHO कडून मंजूरी

कोवोवॅक्स अत्यंत सुरक्षित आणि गुणवत्ता देणारी लस असल्याचे सांगण्यात आले आहे.

WHO Approval Covavax for emergency use
आता लहान मुलांनाही मिळणार लस, Covavaxच्या आपत्कालीन वापरासाठी WHO कडून मंजूरी

कोरोना महामारीशी लढण्यासाठी भारताला आणखी एक हत्यार मिळाले आहे. देशातील लहान मुलांना आता कोरोना विरोधात लढण्यासाठी लस मिळणार आहे कारण भारतात तयार झालेल्या कोवोवॅक्सच्या (Covavax)  लसीच्या आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO ) मंजूरी दिली आहे. सीरम इस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे. कोवोवॅक्सिन ही भारतात तयार झालेली तिसरी स्वदेशी लस आहे ज्याला आत जागतिक आरोग्य संघटनेने मंजूरी दिली आहे. १८ वर्षांखालील लहान मुलांसाठी ही लस तयार करण्यात आली आहे.  कोवोवॅक्स अत्यंत सुरक्षित आणि गुणवत्ता देणारी लस असल्याचे सांगण्यात आले आहे. या आधी स्वदेशी कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन अशा दोन लसींना जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करत ही माहिती दिली त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, कोवोवॅक्सला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजूरी मिळाल्याने कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील हा आणखी एक मैलाचा दगड आहे. कोवोवॅक्सला आपत्कालीन वापरासाठी मंजूरी दिल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचे आभार.

अदर पूनावाला यांनी पुढे असे म्हटले आहे की, पुण्यात या आठवड्यात तयार होणाऱ्या कोवोवॅक्सच्या पहिल्या बॅचचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. १८ वर्षांखालील मुलांचे संरक्षण करण्यासाठी या लसीमध्ये मोठी क्षमता आहे. संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन

सीरम इन्स्टिट्यूटने कोवोवॅक्सच्या निमिर्ती आणि पाठपुरवठ्यासाठी अमेरिका स्थित बायोटेक कंपनीच्या नोव्होवॅक्सशी करारा केलाय. SII ने कोवोवॅक्स लसीच्या १.१ मात्र तयार करण्यासाठी करार केला आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मंजूरीनंतर कोवोवॅक्स लसीचा पुरवठा देखील वाढवण्यात येईल.

नोव्होवॅक्सला नुकतेच इंडोनेशिया आणि फिलिपीन्स येथे आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली. तसेच युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया,न्यूझीलँड,कॅनडा आणि जागतिक आरोग्य संघटनेकडे या लसीच्या नियामक दाखल करण्याची घोषणा करण्यात आली आहे.