घरदेश-विदेशविजय रुपाणी नंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज होणार...

विजय रुपाणी नंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण? विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज होणार निर्णय

Subscribe

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवीन मुख्यमंत्र्याचे नाव घोषित करण्याची शक्यता आहे. आज, रविवारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी साधारण दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात विधानसभेच्या १८२ सदस्यीय निवडणुका डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहेत.

दरम्यान, भाजपचे केंद्रीय नेते नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे नेते तरुण चुग गुजरातला दाखल झाले आहेत. यावेळी तोमर म्हणाले की, विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण होईल, हे विषय आमच्यासाठी सामान्य आहेत. आम्ही आज प्रदेशाध्यक्ष आणि इतरांशी चर्चा करू. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील विधीमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

कोरोना महामारीच्या काळात भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये पद सोडणारे चौथे मुख्यमंत्री रुपाणी हे होते. त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रुपाणी यांचा राजीनामा जाहीर झाल्यानंतर लगेचच भाजप सरचिटणीस बीएल संतोष आणि गुजरात राज्य प्रभारी भूपेंद्र यादव यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट देखील घेतली होती. असे सांगितले जात आहे की, विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवारांच्या नावांबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असून याशिवाय केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि माजी गृह राज्यमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याकडेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहे.


साकीनाकामध्ये निर्भया! ३२ वर्षीय महिलेवर अमानुष बलात्कार

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -