Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश बाबो.. मिटींग सुरु असतानाच पत्नी झाली रोमँटीक आणि मग...

बाबो.. मिटींग सुरु असतानाच पत्नी झाली रोमँटीक आणि मग…

सोशल मीडियावर व्हिडिओ घालतेय धुमाकूळ

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ वायरल झाले आहेत. कोरोना संकटामुळे देशातील अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु आहे. यामुळे कर्मचारी आपल्या घरातून काम करतायत तसेच ऑनलाईन मिटिंगलाही हजर राहत आहेत. अशीच एका कंपनीच्या मिटिंगची व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती ऑनलाईन बैठकीला उपस्थित होता. यावेळी त्याची पत्नी मस्ती करत होती. व्हिडिओ कॉन्फ्रेंस सुरु असताना पत्नीने पतीला किस करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये असे दिसते की, एक व्यक्ती आपल्या घरातून कंपनीच्या मिटींगला ऑनलाईनमाध्यमातून हजेरी लावली होती. तसेच तो कर्मचारी व्यस्त असताना अचानक पत्नी येते आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करते. यावेळी पती थोडा मागे होऊन पत्नीला आपण व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगमध्ये असल्याचे सांगतो. पत्नी बघून हसायला लागते आणि तिथून बाजूला होता.

- Advertisement -

पत्नी तिथून गेल्यावर कर्मचारी पुन्हा आपल्या मिटींगमध्ये व्यस्त होतो आणि कामास सुरुवात करतो. बहुतेक पत्नीला माहित नव्हते की आपला पती कंपनीच्या कामात व्यस्त आहे. वर्क फ्रॉम होमचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हा व्हिडिओ आईपीएस ऑफिसर रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. तसेच त्यांनी या व्हिडिओला वर्क फ्रॉम होमचे नुकसान असे कॅप्शन दिले आहे.

या मिटींगचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पत्नीची प्रचंड प्रशंसा करण्यात आली तर काहींनी नापसंती दाखवली. सोशल मीडियावर व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे की, पती नशीबवान आहे की, त्याला इतकी रोमॅन्टिक बायको मिळाली आहे.

- Advertisement -