घरदेश-विदेशदिल्लीतील वाढत्या कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

दिल्लीतील वाढत्या कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

Subscribe

कोरोनाच्या वाढते संक्रमण लक्षात घेता संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात होणार होते. पण, दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुढे ढकलले आहे. आता हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबतच होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारी, फेब्रुवारीमध्ये होणार आहे, अशी माहिती संसदिय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

संसेदेचे पावसाळी अधिवेशन सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत सदस्यांची आसनव्यवस्था लोकसभा आणि राज्यसभा या सदनामध्ये करण्यात आली होती. मात्र, यावेळी अनेक संसद सदस्य आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. दरम्यान, आता दिल्लीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढला आहे. यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या दरम्यानच्या काळात होणारे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले. त्यामुळे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबत होणार आहे. १ फेब्रुवारीपासून संसंदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे.

- Advertisement -

तथापि, सप्टेंबरमध्ये झालेले पावसाळी अधिवेशनावेळी ४० जणांना कोरोनाची लागण झाली होती. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर या कालावधीत झाले होते.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट

संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलल्यानंतर आता विधीमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत ७ डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. पण ते आता जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नागपूर येथे होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला. यावर भाजपने टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -