घरताज्या घडामोडीनिम्म्या पगारात काम करणार का? विप्रोची नव्या उमेदवारांना ऑफर

निम्म्या पगारात काम करणार का? विप्रोची नव्या उमेदवारांना ऑफर

Subscribe

जगभरात आलेल्या मंदीच्या सावटामुळे अनेक कंपन्यांनी आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कर्मचारी कपात केली आहे. एकीकडे अनेक बड्या कंपन्यांमधील ही कर्मचारी कपात थांबलेली नसतानाच आता दुसरीकेडे मात्र आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपनी विप्रो कंपनीने एक नवा निर्णय घेतला आहे.

जगभरात आलेल्या मंदीच्या सावटामुळे अनेक कंपन्यांनी आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी कर्मचारी कपात केली आहे. एकीकडे अनेक बड्या कंपन्यांमधील ही कर्मचारी कपात थांबलेली नसतानाच आता दुसरीकेडे मात्र आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपनी विप्रो कंपनीने एक नवा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नवीन उमेदवारांना कमी पगारात काम करणार का? अशी विचारणा करण्यात आली आहे. याबाबत कंपनीने त्यांना एक मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी वार्षिक साडेतीन लाख रुपयांमध्ये काम करु शकता अशी विचारणा केली आहे. (Wipro cuts down salary offers to freshers amid delay in onboarding)

विप्रो कंपनीच्या या मेलमुळे इच्छुक उमेदवार गोंधळून गेले असून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी कंपनी नवीन उमेदवारांना साडेसहा लाख रुपये वार्षिक पगार देत होती. याबाबत बिजनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, Wipro कंपनीने आपल्या नव्या कर्मचाऱ्यांना एक मेल केला आहे. कंपनीतील नव्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 6.5 (LPA -Lakhs Per Annum) लाख रूपये आहे, ते सध्या ऑन रोल जाण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या कर्मचाऱ्यांना हा ईमेल पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

‘आमच्याकडे प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी जागा खाली आहेत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना ही संधी देऊ इच्छित आहे. तसेच, जर कोणी इच्छुक असेल तर त्यांना मार्च 2023 पासून ऑनबोर्ड घेण्यात येईल. या अगोदरच्या सर्व ऑफर बरखास्त करण्यात आलेल्या आहेत’, असे कंपनीने ई-मेलमध्ये म्हटले आहे.

या ईमेल मध्ये कर्मचाऱ्यांना 3.5 लाख सॅलरीवर रुजू होण्याची तयारी आहे का? असा सवाल विचारण्यात आला आहे. सध्या असणाऱ्या सॅलरीच्या अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर केला आहे. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संसद रत्न पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर, अमोल कोल्हेंसह महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -