घरताज्या घडामोडीCorona virus: कोरोना महामारीचा लवकरच अंत होण्याची घोषणा? आता WHOचे तज्ज्ञ म्हणतात...

Corona virus: कोरोना महामारीचा लवकरच अंत होण्याची घोषणा? आता WHOचे तज्ज्ञ म्हणतात…

Subscribe

गेल्या दोन, अडीच वर्षांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना व्हायरस आता नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत आता लवकरच कोरोना महामारीचा अंत होण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांकडून चर्चा सुरू करण्यात आली आहे. यात कोरोना महामारीचा अंत झाला असे जाहीर केल्यावर काय परिणाम होतील याबाबत चर्चा केली जात आहे.

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. कोरोना व्हायरसचा अंत झालाय हे समजण्यासाठी कोणते निकष? किंवा संकेत यासह नियमावली काय असेल? याबाबत जागतिक आरोग्य संघटनेची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र ही घोषणा इतक्यात तरी होणार नसल्याचे देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान कोरोना संपूर्णपणे नाहीस झाल्याची अशी घोषणाकरण्यासाठी संबंधित समिती आवश्यक निकषांची पडताळणी करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

एकीकडे कोरोना संपला आहे अशी घोषणा करण्याच्या तयारीत असतानाच आता दुसरीकडे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची साथ पसरली आहे. माहितीनुसार, जवळपास दोन वर्षानंतर पहिल्यांदाच रविवारी चीनमध्ये कोरोना रुग्णांची ३ हजार ३०० हून अधिक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. अनेक शहरांमध्ये लोकांना सध्या घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, तर शांघायमधील शाळा देखील बंद करण्यात आल्यात आहे. खबरदारी म्हणून अनेक शहरामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शेन्झेन शहरात कडक लॉकडाऊनची घोषणा चीन सरकारने केली आहे.

हॉंगकॉंगमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. हाँगकॉंगमध्ये कोरोनाबाबतची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे आहे. अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या २७ हजार ६४७ नवीन रुग्णांची नोंद केली आहे, तर कोरोनामुळे ८७ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Barack Obama Covid-19 Positive: बराक ओबामांना कोरोनाची लागण; पंतप्रधान मोदींनी लवकर बरे होण्यासाठी केली प्रार्थना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -