घरताज्या घडामोडीकरोनाग्रस्तांसाठी अहोरात्र राबणाऱ्या डॉक्टरांची काय आहे अवस्था

करोनाग्रस्तांसाठी अहोरात्र राबणाऱ्या डॉक्टरांची काय आहे अवस्था

Subscribe

संपूर्ण जगात करोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. करोना संसर्गजन्य असल्याने करोनाची लागण झालेल्या रुग्णांजवळ जाण्यासही कोणी धजावत नाही. पण जगभरात केवळ डॉक्टर हीच एक अशी व्यक्ती आहे जी देवदूत बनून जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहे. या रुग्णसेवेत संसर्ग होऊन अनेक डॉक्टरही व्हेंटीलेटरवर पोहचलेत. पण तरीही न डगमगता रुग्णसेवाचा वसा घेतलेले लाखो डॉक्टर आज अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत.अशाच काही डॉक्टरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत . जे बघितल्यावर त्यांच्यावरील ताणाची जाणीव प्रत्येकाला होईल.

यातील काही डॉक्टर्स गेल्या महिन्याभरापासून घरी गेलेले नाहीत. रुग्णालयातच ते रु्ग्ण सेवा करत आहे. अशावेळी मिळेल तिथे उसंत मिळताच क्षणभराची विश्रांती ते घेत आहेत.

- Advertisement -

कधी अॅम्ब्युलन्समध्ये तर कधी स्ट्रेचरवर

- Advertisement -

तर कधी ट्रॉलीवर.

तर कधी जमिनीवर

कधी टेबलावर बसल्या बसल्या

तक कधी वॉर्डमधील रिकाम्या कॉटवर. हा सगळा त्रास फक्त आपल्यासाठी. तुम्ही आम्ही सुरक्षित राहाव म्हणून.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -