घर दिवाळी 2022 माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अर्पण करा 'हे' पाच नैवेद्य, होईल भरभराट

माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अर्पण करा ‘हे’ पाच नैवेद्य, होईल भरभराट

Subscribe

प्रत्येकाला आयुष्यात हवी असणारी भरभराट ही श्रीलक्ष्मीच्या आशिर्वादानेच होते. यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला प्रिय असलेल्या विशेष पदार्थांचा नैवेद्य केला जातो.

दिवाळी म्हणजे अंध:काराकडून प्रकाशाकडे नेणारा सगळ्यांचाच आवडता सण. यामुळे दिवाळीत येणारे बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज हे देखील तेवढेच महत्वाचे . त्यातही लक्ष्मीपूजन हे सर्वात महत्वाचे. कारण प्रत्येकाला आयुष्यात हवी असणारी भरभराट ही श्रीलक्ष्मीच्या आशिर्वादानेच होते. यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला प्रिय असलेल्या विशेष पदार्थांचा नैवेद्य केला जातो.

गूळाचा हलवा

- Advertisement -

रवा, गूळ आणि सुकामेव्यापासून हा हलवा तयार केला जातो. याला आपल्याकडे गूळाचा शिरा असेही म्हणतात.

पंचामृत
देवीला पंचामृत अर्पण केले जाते. मध, दही, दूध. तूप आणि साखर या पाच वस्तूंपासून पंचामृत तयार केले जाते. पूजा झाल्यानंतर देवीला प्रसाद म्हणून अपर्ण केले जाते.

- Advertisement -

खीर
देवीला खीर फार प्रिय आहे. यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला सुकामेवा टाकलेला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य द्यावा.

बुंदीचे लाडू
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपतीचीही पूजा अर्चा केली जाते. बाप्पाला लाडू आवडत असल्याने या दिवशी लाडवाचा प्रसाद गणेशाला अर्पण करावा. यामुळे माता लक्ष्मीबरोबरच गणपतीचीही कृपादृष्टी तुमच्यावर वर्षभर राहील.

काजू बर्फी

काजूच्या विना कुठलीही मिठाई परिपूर्ण होत नाही. याच काजूपासून बनवण्यात आलेली बर्फी देवीला प्रिय आहे.यामुळे देवीला काजू कतलीचा नैवेद्य द्यावा. पूजा झाल्यानंतर हीच मिठाई प्रसाद म्हणून वाटावी.

- Advertisment -