घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाडी. एस. ट्युटोरिअल्समध्ये अवतरली आकाशगंगा!

डी. एस. ट्युटोरिअल्समध्ये अवतरली आकाशगंगा!

Subscribe

रीना पत्की यांच्या या क्लासमध्ये इको फ्रेंडली पद्धतीने गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. यांची गणेशाची मूर्ती फायबरची आहे, जिचं ते कधीच विसर्जन करत नाहीत. मात्र असं असलं, तरी दरवर्षीची सजावट मात्र वेगवेगळी असते. यंदा त्यांनी सूर्यमालेची प्रतिकृती उभारली आहे. आणि या सजावटीसाठी फक्त कागद, पुठ्ठे, कापड, माती, वाळू, नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे. गेल्या चार वर्षांपासून इथे गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी इको फ्रेंडली सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे.

असं म्हणतात की मुलांना लहान वयातच सामाजिक जबाबदारीचं भान दिलं, तर त्यांच्यात ‘आपण समाजाविषयी देणं लागतो’, ही भावना अगदी सुरुवातीपासूनच रुजवता येईल. कुर्ल्याच्या डी. एस. ट्युटोरिअल्सने सुद्धा असाच काहीसा प्रयत्न केला आहे. रीना पत्की यांच्या या क्लासमध्ये इको फ्रेंडली पद्धतीने गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. यांची गणेशाची मूर्ती फायबरची आहे, जिचं ते कधीच विसर्जन करत नाहीत. मात्र असं असलं, तरी दरवर्षीची सजावट मात्र वेगवेगळी असते. यंदा त्यांनी सूर्यमालेची प्रतिकृती उभारली आहे. आणि या सजावटीसाठी फक्त कागद, पुठ्ठे, कापड, माती, वाळू, नैसर्गिक रंगांचा वापर केला आहे. गेल्या चार वर्षांपासून इथे गणेशोत्सव साजरा केला जातो. पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी इको फ्रेंडली सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे.


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करु शकता.

D S Tutorial Galaxy Decoration
कुर्ल्याच्या डी. एस. ट्युटोरिअल्सने साकारली आकाशगंगा

तुमचे सेल्फी अपलोड करण्यासाठी क्लिक करा… 

- Advertisement -

तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…


तुम्हाला हे माहिती आहे का? – आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -