घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥
सर्व इंद्रियांची गती कुंठित होते; स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो; मन वेडावून प्राण घोटाळतो.
अग्नीचें अग्नीपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ॥
जठराग्नी विझून जातो व त्याचा धूर चोहीकडे होतो; त्यामुळे शरीरातील ज्ञान अच्छादित होते.
जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळे होय ॥
ज्याप्रमाणे चंद्राच्या आड पाण्याने भरलेले व दाट ढग आल्यावर धड अंधार ना प्रकाश असे झावळे झावळे होते,
कां मरेना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥
त्याचप्रमाणे तो मरतही नाही व सावधही नसतो. अशा रीतीने जीविताची स्थिती झालेली असते व आयुष्य हे मरणाची वेळ पाहत असते,
ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी । तेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥
अशा प्रकारे मन, बुद्धि व इंद्रिये यांच्या सभोवती धूर अतिशय कोंडतो, त्या वेळेस जन्मभर मिळविलेले सर्व फायदा नाश पावतात.
हां गा हातीचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे । म्हणौनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥
हे पहा, ज्या वेळेला हातात असलेले जाते त्यावेळी दुसरीकडून आणखी फायदा होईल, याची गोष्टच कशाला? म्हणून मरणसमयी अशी दशा प्राप्त होते.
ऐशी देहाआंतु स्थिती । बाहेरि कृष्णपक्षु वरि राति । आणि सामासही वोडवती । दक्षिणायन ॥
याप्रमाणे देहाच्या आतील स्थिती असून बाहेर कृष्णपक्षाचा पंधरवडा असतो व त्यात रात्र आणि दक्षिणायनातील सहा महिन्यांपैकी एक महिना ही प्राप्त होतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -