घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नातरी आकाशाचे खोंपें । वायु निवांतुचि लोपे । कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥
अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायु नाहीसा होतो किंवा पाण्यात उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यातच नाहीशा होतात,
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे । तैसें प्राकृत प्रकृतीं मिळे । कल्पक्षयीं ॥
किंवा जागे झाल्यावर मनातले स्वप्न मनातच मावळते, त्याप्रमाणे महाकल्पाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतीतच मिळतात.
मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती । तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ती आइक ॥
मग सृष्टीच्या आरंभी पुनः ती मीच निर्माण करितो, अशी जी शास्त्रात बोलवा आहे, तीविषयीची खरी स्थिती तुला सांगतो, ती ऐक.
तरी हेचि प्रकृती किरीटी । मी स्वकीया सहजें अधिष्टीं । तेथ तंतूसमवाय पटीं । जेविं विणावणी दिसे ॥
तर अर्जुना, याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करितो, तेव्हा वस्त्राच्या विणीमध्ये तंतूंचा जसा संबंध दिसतो,
मग तिये विणावणीचेनि आधारें । लहाना चौकडिया पटत्व भरे । तैसी पंचात्मकें आकारें । प्रकृतीचि होयें ॥
आणि मग त्या विणकरीच्या आधाराने जसे लहानलहान चौकड्यांनी वस्त्र बनते, त्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या आकाराने प्रकृतीच बनते,
जैसें विरजणियाचेनि संगें । दुधचि आटेजों लागे । तैशी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया ॥
ज्याप्रमाणे विरजणाच्या संगतीने (संबंधाने) दूधच आटू लागते (घट्ट होऊ लागते), त्याप्रमाणे प्रकृती सृष्टीच्या आकाराने परिणाम पावू लागते. स्वत: प्रकृतीच सृष्टी बनू लागते.
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये । तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ॥
(पाणी हे जसे निमित्त आहे) ज्याप्रमाणे, पाण्याच्या सान्निध्याने बीजाला फांद्या वगैरे फुटून त्याचे झाड होते, त्याप्रमाणे प्रकृतीचा पसारा माझ्यामुळे होतो. (तसाच मी सृष्टीचे निमित्त आहे.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -