घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

नातरी ज्वरें विटाळलें मुख । तें दुधातें म्हणे कडू विख । तेविं अमानुषा मानुष । मानिती मातें ॥
किंवा तापाने कडू तोंड झाल्यावर त्याला ज्याप्रमाणे दूध विषासारखे कडू लागते, त्याप्रमाणे मी मनुष्य नसूनही मनुष्य आहे असे मला मानतात
म्हणौनि पुढतपुढती धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया । जे यिया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥
म्हणून हे धनंजया, वारंवार सांगतो की, या अभिप्रायाला कदाचित विसरशील हो! कारण, जर नुसत्या स्थूल दृष्टीने पाहू लागलास, तर तुझे पाहणे व्यर्थ होईल.
पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें । जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥
ज्याप्रमाणे स्वप्नांतील अमृताने कोणी अमर होत नाही, त्याप्रमाणे जे मला स्थूलदृष्टीने पाहतात ते मला खरोखर पाहत नाहीत.
एर्‍हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ । परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥
एर्‍हवी अज्ञानी लोक स्थूलदृष्टीने मला जाणले असे म्हणतात, परंतु त्यांचे स्थूलदृष्टीचे जाणणेच यतार्थ ज्ञानाच्या आड येते.
जैसा नक्षत्राचिया आभासा । साठीं घातु झाला तया हंसा । माजीं रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥
ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते मोतीच आहे असे समजून ते प्राप्त करून घेण्याकरिता हंसपक्षी पाण्यात उडी टाकून प्राणास मुकतो.
सांगैं मंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ । काय सुरतरु म्हणौनि बाबुळ । सेविली करी? ॥
गंगा आहे असे समजून मृगजळाजवळ जर कोणी गेला, तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल, सांग बरे? त्याचप्रमाणे, कल्पवृक्ष समजून बाभूल हाती धरल्यावर त्याचा काय उपयोग होणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -