घरमहाराष्ट्रManohar Joshi Passed Away : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, 'हिंदुजा'मध्ये...

Manohar Joshi Passed Away : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन, ‘हिंदुजा’मध्ये घेतला अखेरचा श्वास

Subscribe

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज, शुक्रवारी 23 फेब्रुवारीला निधन झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज, शुक्रवारी 23 फेब्रुवारीला निधन झाले आहे. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मध्यरात्री 3 वाजून 2 मिनिटांनी वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Former Chief Minister Manohar Joshi passed away Shiv Sena Politician)

हेही वाचा… Manohar Joshi : संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’…डॉ. मनोहर गजानन जोशी !

- Advertisement -

मनोहर जोशी हे शिक्षक असल्याने त्यांची ‘सर’ म्हणून ओळख होती. कालांतराने राजकारणातही त्यांची सर म्हणूनच ओळख झाली. मनोहर जोशी यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर जोशी सर यांची अंत्ययात्रा सुरू होईल. दादर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीयमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष अशा महत्वाच्या पदांवर डॉक्टर मनोहर जोशी यांनी काम केले होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. प्रकृती अस्वस्थामुळे मनोहर जोशी गेल्या बऱ्याच काळापासून सक्रीय राजकारणापासून दूर होते.

- Advertisement -

ज्येष्ठ राजकारणी मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बाळासाहेबांनी एका ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री केल्याने त्यांच्यावर सडकून टीका झाली होती. परंतु, त्यावेळी जोशी यांनी आपल्या कामातून आपली वेगळी छाप पाडली. बालपण-ध्येयाकडे खडतर सुरुवात सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्राने लहानपणापासूनच संघर्ष करून त्यांनी आपल्या जीवनाचा गाडा हाकला होता.

एका खेडेगावात जन्मलेले मनोहर जोशी शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केले. 1995 साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -