घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जयांचे वाचेपुढां भोजें । नाम नाचत असे माझें । जें जन्मसहस्रीं वोळगिजे । वेळ एक यावया ॥
ज्या माझ्या नावाचा मुखाने एकदा यतार्थ उच्चार होण्याकरिता सहस्र जन्म माझी सेवा करावी लागते, ते माझे नाव ज्यांच्या वाचेपुढे कौतुकाने नाचत असते.
तो मी वैकुंठीं नसें । वेळू एक भानुबिंबींही न दिसें । वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥
(ज्या माझ्या नावाचा असा महिमा आहे,) तो मी वैकुंठलोकीही नसतो, सूर्यमंडळातही दिसत नाही; इतकेच नव्हे, तर योग्याच्याही मनाचे उल्लंघन करून जातो.
परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥
परंतु हे पांडवा, जरी मी कोठे सापडलो नाही, तरी जे माझ्या नावाचा सतत घोष करितात, त्यांच्याजवळ सापडायाचाच.
कैसे माझ्या गुणीं धाले । देशकालातें विसरले । कीर्तने सुखी झाले । आपणपांचि ॥
ते माझ्या गुणांनी इतके तृप्त झालेले असतात की, ते देशकालाला विसरून माझ्या नामाच्या संकीर्तनाने आपल्या ठिकाणी सुखी झालेले असतात.
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध । माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥
कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद या शुद्ध नावाच्या कविता गातात आणि मधूनमधून शुद्ध आत्मविषयक चर्चा करितात.
हें बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं । एक विचरती चराचरीं । पंडुकुमरा ॥
हे पंडुकुमरा, अशा प्रकारे आणखी अनेक तर्‍हेने माझे गुणानुवाद वर्णन करीत कोणी जगतात हिंडतात.
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना । पंचप्राणा मना । पाढाऊ घेउनी ॥
अर्जुना, मग दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना सर्वथैव जिंकून जयपत्र मिळवितात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -