घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते । उपासिती मातें । ते सांगितले ॥
परंतु हे असो, या योग्य ज्ञानयज्ञाने यज्ञ करून जे माझी उपासना करतात, ते भक्त तुला सांगितले.
अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं । कीं नेणणें यासाठीं मूर्खीं । न पविजेचि मातें ॥
सदासर्वकाली जी जी कर्मे होतात, ती सर्व बाजूने मला सहज पावतात, परंतु हे मूर्खांना समजत नसल्यामुळे मी त्यांना प्राप्त होत नाही.
तोचि जाणिवेचा जरी उदयो होये । तरी मुद्दल वेदु मीचि आहें । आणि तो विधानातें जया विये । तो क्रतुही मीचि ॥
त्याच ज्ञानाचा उदय झाला असता मुख्य वेद मीच आहे, त्यात विधी-अनुष्ठान जे सांगितले आहे तो ऋतुही (यज्ञ) मीच.
मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा । यज्ञु प्रकटे पांडवा । तोही मी गा ॥
मग हे पांडवा, त्या कर्मापासून प्रकट होणारा जो यथाविधी यज्ञ, तोही मीच आहे.
स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा । आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥
देवास हवी देण्याचा मंत्र मी, पितरासही हवी देण्याचा मंत्र मी, सोमवल्ली वगैरे नाना प्रकारच्या औषधी मी, घृत मी, समिधा मी, मंत्र मी, होमद्रव्य मी.
होता मी हवन कीजे । तेथ अग्नी तो स्वरूप माझें । आणिक हुतक वस्तू जें जें । तेही मीचि ॥
ऋत्विज मी, ज्यात हवन करावयाचे तो अग्नीही माझे स्वरूप आहे आणि अग्नीत हवन करण्याच्या ज्या ज्या वस्तू, त्याही मीच आहे.
पैं जयाचेनि अंगसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगें । जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥
हे पाहा-ज्याच्या अंगसंगाने अष्टांग प्रकृती ही जगास प्रसवते, तो जगत्पिता मी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -